मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सर्व प्रयत्नांनंतरही, महागाई सलग ९व्या महिन्यात समाधानकारक पातळीच्या वर आहे. यामुळे मोदी सरकारने आरबीआयला महागाई आटोक्यात का येत नाही? असा प्रश्न केला आहे. आरबीआयला यावरून आता केंद्र सरकारला अहवाल द्यावा लागेल आणि त्याचे कारण सविस्तर सांगावे लागेल. महागाई निर्धारित मर्यादेत का ठेवता आली नाही आणि ती आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे या अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे. २०१६ मध्ये चलनविषयक धोरण आराखडा अंमलात आल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, आरबीआयला अहवालाद्वारे सरकारला त्यांच्या पावलांची माहिती द्यावी लागेल. येथे, नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६ वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
किरकोळ महागाई आटोक्यात आणण्याची जबाबदारी!!
किरकोळ महागाई दर २ टक्क्यांच्या फरकासह ४ टक्के राखण्याची जबाबदारी आरबीआयकडे सोपवण्यात आली आहे.
नियम काय सांगतो?
रिझव्र्ह बँक कायद्यानुसार, सलग तीन तिमाहीत चलनवाढीचे उद्दिष्ट गाठले नाही, तर आरबीआयने केंद्र सरकारला अहवाल देणे आवश्यक आहे.
किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या वर, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम
- खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली.
- यंदाच्या एप्रिलपासूनचा हा पाच महिन्यांचा उच्चांक आहे.
- त्यावेळी किरकोळ किमतींवर आधारित महागाई (CPI) ७.७९ टक्के होती.
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये सलग ९व्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या वर राहिला.
- ऑगस्टमध्ये ते ७ टक्के आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ४.३५ टक्के होते.
- ऑगस्टमधील ७.६२ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ८.६० टक्क्यांवर पोहोचली.
- केंद्र सरकारने आरबीआयला किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे.
किरकोळ महागाई: या वस्तूंच्या किमती वाढल्या
- सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली, जी अपेक्षेपेक्षा जास्त होती.
- तज्ज्ञांनी कमाल किरकोळ महागाई ७.३० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला होता.
- नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
- त्याचबरोबर इतर सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
- यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त होती.
तृणधान्ये, भाजीपाला, डाळी, दूध यासह अन्य वस्तू महागल्या
उत्पादन सप्टेंबर ऑगस्ट
तृणधान्ये ११.५३% ९.५७%
मांस-मासे २.५५% ०.९८%
दूध ७.१३% ६.३९%
भाजी १८.०५% १३.२३%
डाळ ३.०५% २.५२%
मसाले १६.८८% १४.९०%
अन्न-पेय ८.४१% ७.५%
फॅब्रिक ९.९०% ९.५८%
पादत्राणे १२.३०% ११.८५%
गृहनिर्माण ४.५७% ४.०६%
अंडी – -१.७९% -४.५७%
आरोग्य ५.५२% ५.४३%
तेल-चरबी, इंधन-वीज, फळे, साखर यातील महागाई ऑगस्टच्या तुलनेत कमी झाली आहे.
या राज्यांमध्ये सर्वाधिक महागाई
- आकडेवारीनुसार, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ महागाईचा दर सर्वाधिक होता. या राज्यांमध्ये हा दर ८.०६ टक्के ते ९.४४ टक्के इतका होता.
- दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि बिहार ही सर्वात कमी महागाई असलेली राज्ये होती. येथे महागाई ४.०३% ते ६.३८% दरम्यान होती.
- उत्तर प्रदेशात हा दर ७.७९ टक्के होता. हरियाणा ७.९५ टक्के, उत्तराखंड ७.२७ टक्के आणि पंजाब ५.६० टक्के नोंदवले गेले.