मुक्तपीठ टीम
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी सरकार स्वातंत्र्याच्या ‘अज्ञात’ नायकांचा सन्मान करणार आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी, केंद्र सरकार स्वातंत्र्यानंतर इतिहासाच्या पानावर हरवलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवेल. मोदी सरकार अशा वीरांचा सन्मान करणार आहे. सरकार स्वातंत्र्यलढ्यात कामगिरी बजावली असतानाही जे लोकांना माहित नाही आहेत अशा नायकांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहे. त्यासाठी स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित केले जाणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!
• स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करत आहे.
• या अंतर्गत 75 प्रादेशिक, सहा राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले जात आहेत.
• यामध्ये, अज्ञात नायक आणि कमी प्रसिद्ध असणारे गट आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या घटना प्रदर्शित करण्याची योजना सरकारने आखली आहे.
• यासाठी सरकारने अशा 146 अज्ञात नायकांची आणि गटांची यादी तयार केली आहे.
सन्मानासाठी निवड केलेल्यांविषयी विशेष माहिती
• केंद्र सरकारने ज्यांची स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरी अज्ञात आहे अशा १४६जणांची यादी तयार केली आहे.
• या अज्ञात नायकांच्या नावांमध्ये अनुसूचित जमाती आणि जातींचे नायक देखील समाविष्ट आहेत. असे म्हटले जात आहे.
• झारखंडच्या तेलंगणाच्या खारियाची नावे समाविष्ट आहेत ज्यात घेलूभाई नाईक, जनसंघाचे माजी विचारवंत नानाजी देशमुख, लक्ष्मण नायक, कोमाराम भीम यांचा समावेश आहे.
• या यादीमध्ये हिंदू महासभा, कर्नाटक साहित्य परिषद आणि बंगालच्या अनुशीलन समितीचा समावेश आहे.
ज्ञान नायकांच्या समावेशावर प्रश्न?
• या यादीत सुभाषचंद्र बोस, बिरसा मुंडा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींच्या समावेशाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
• हे काही स्वातंत्र्ययोद्धे अज्ञात नाहीत, त्यामुळे त्यांची नाव अज्ञात यादीतून वगळण्याची मागणी सरकारकडे केली आहे.