Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेकडून बृजभूषण, शरद पवार, सुप्रिया सुळेंचा एकत्र फोटो ट्वीट! पण मावळच्या कुस्ती स्पर्धेतील तो फोटो काय सांगतो?

May 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Bribhushan Raj And Sharad Pawar

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधामागे महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप पुण्यातील सभेत केला. आता मनसेकडून उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो मनसेकडून ट्वीट करण्यात आले आहेत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी फोटो ट्वीट केले असून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधामागे पवारांचा हात असल्याचा आरोप मनसेकडून सुरु आहे. प्रत्यक्षात ते फोटो पुण्याच्या मावळमधील कुस्ती स्पर्धेतील असल्याने त्यावरून थेट सापळ्याचा आरोप टोकाचा असल्याचं मानलं जातं.

कुछ फोटो अच्छे…और सच्चे होते है!

मनसे नेते सचिन मोरे यांनी ट्वीट केलं आहे, या ट्वीटमध्ये त्यांनी बृजभूषण सिंह आणि शदर पवार यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, ‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है,’ असं कॅप्शन दिलं आहे.

कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y

— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022

राज ठाकरे यांनी नाव न घेता केला होता सापळ्याचा आरोप

  • मी अयोध्या दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले.
  • त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली.
  • त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला.
  • अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो.
  • मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही.
  • मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते.
  • तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते.
  • कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते.
  • त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता.
  • ससेमिरा मागे लावण्यात आला असता.
  • हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला.

मुक्तपीठ विश्लेषण – नेमकं काय असावं?

  • बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
  • शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत.
  • मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे.
  • सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असे या फोटोतील फलकावर लिहिलेलं दिसत आहे.
  • त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष या नात्याने बृजभूषण आले असताना राज्याचे अध्यक्ष असणारे शरद पवार तेथे उपस्थित असावेत, असं दिसतं.
  • त्यामुळे मनसेनं जरी कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न फोटोतून केला असला तरी त्यातून थेट राज ठाकरेंचा सापळ्याचा आरोप सिद्ध होतो असं नाही.
  • त्यातही पु्न्हा अनेकदा शरद पवारांचे समर्थक काही घडलं तरी ते साहेबांनीच घडवलं असं मानून चालतात, तशा स्वरुपाचा हा आरोप वाटत आहे.
  • मुळात उत्तरप्रदेशातील एक भाजपा खासदार तोही दाखलेबाज असणारा, राज्यातील योगी आदित्यनाथांसारख्या आक्रमक नेता मुख्यमंत्री असताना भाजपाच्याच एका राज्यातील रणनीतीला धक्का देण्याचा प्रयत्न दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून करेल, असं शक्य नाही.
    तसंच खासदार बृजभूषण यांनी मला अमित शाह, जेपी नड्डा या प्रकरणी कॉल करणार नाहीत, असं ज्या आत्मविश्वासाने सांगितलेले तेही वेगळंच सुचवत असल्याचं दिसत आहे.
  • मुळात जर योगी आदित्यनाथांनी ठरवलं असतं तर बृजभूषणच काय आणखीही कोणी आडवं आलं असतं तरी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अशक्य नव्हता. त्यांचं या प्रकरणातील मौनही खुपणारंच होतं.

Tags: Ayodhya VisitBrijbhushan SinghmnsNCPRaj Thackeraysharad pawarअयोध्या दौराबृजभूषण शरण सिंहमनसेराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

कला-परंपरेचा अविष्कार शिल्पग्राम उद्यान!

Next Post

मध्य रेल्वेतील घाट विभागांचे मान्सून निरीक्षण, कल्याण- लोणावळा विभागातील खबरदारीचा आढावा

Next Post
Monsoon monitoring of ghat sections on Central Railway

मध्य रेल्वेतील घाट विभागांचे मान्सून निरीक्षण, कल्याण- लोणावळा विभागातील खबरदारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!