मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने नुकताच सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून भाजपाने राज्य सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर टीका केली आहे. त्यातच वाइन म्हणजे दारू नाही म्हणणारे संजय राऊत हे सर्वांचेच लक्ष्य ठरत आहेत. सोमय्यांनी राऊतांवर वाइन विक्री कंपनीच भागिदारी उघड करत आरोप केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
- सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
- या निर्णयानंतर प्रमुख विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
- आता वाइन विक्रीच्या निर्णयावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
- संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
- ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी वाइन शॉप चालू करा, कारण सरकारचा महसूल बुडतो आहे असे सांगितले,
- त्यावेळी साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय”ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
…तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल-संजय राऊत
- सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला मंजुरी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर भाजपने टीका केली होती.
- त्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
- वाइन म्हणजे दारु नाही.
- राज्यात वाईनची विक्री वाढली तर, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
- भाजप नेते फक्त विरोध करतात ते शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नाहीत.
- मात्र, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांचे वाइन विक्री कंपनीत भागिदारी असल्याचा आरोप केला.
- त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले.
- संजय राऊतांनीही भाजपा नेत्यांना कडक प्रत्युत्तर दिले.
- आता मनसेने विरोधात सामना सुरु केला आहे.