मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाजपावर आक्रमक चढाई करणाऱ्या पत्रकार परिषदेत आधी जाहीर केलेल्या साडेतीन भाजपा नेत्यांबद्दलचा गौप्यस्फोट टाळल्याने त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर फसवणुकीचा, ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे देशपांडे म्हणाले. तसेच साडेतीन सोडाच त्यांनी साधा ‘स’ही उच्चारला नसल्याचं ते म्हणाले.
राऊत बोलले ‘ते’ साडेतीन कुठे?
- संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हे भाजपामधील साडेतीन लोकांची नावं सांगणार होते.
- पण त्यातील ‘स’ देखील बाहेर आला नाही.
- राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता.
- पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे.
- त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, ४२० चा गुन्हा दाखल करावा.
- त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं.
पत्रकार परिषद राऊतांची, शिवसेनेची नाही!
- ही पत्रकार परिषद राऊतांची वैयक्तिक
- आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती.
- या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते.
- तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं.
- इतकंच नाही तर नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करु नये, जेणेकरुन अशा पद्धतीची कारवाई होणार नाही