मुक्तपीठ टीम
येत्या मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांच्या युतीबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. दरम्यान पुण्यातील काही मनसे नेत्यांनी भाजपाशी युती करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली असून या युतीचा मनसेला निवडणुकांमध्ये चांगलाच फायदा होईल असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी मनपा निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे.
४५ जागा निवडून येणारच मनसेचा दावा
- गेल्या निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात.
- मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता.
- आगामी २०२२ च्या मनपा निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे.
- त्यातील ९० जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार?
- पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ.
- त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.
- म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
- कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.
- अजून निवडणुकांना वेळ आहे.
- सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
- शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही,निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.