मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रावर अतिवृष्टीमुले महाआपत्तीच कोसळली. अनेक गावांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. उद्ध्वस्त संसार पुन्हा उभारण्यासाठी महाराष्ट्रात माणुसकीचाही महापूर आला. मात्र, त्यात एक मदत उठून दिसतेय ती मनसेचे मुंबईच्या धारावीतील पदाधिकारी राजेश सोनावणेंची.
पूरग्रस्त बांधवांचं सारं वाहून किंवा चिखलात गेलं. त्यांच्याकडे अंगावरील अंतवस्त्रही नाहीत. तसंच संकट आलं म्हणून मायभगिनींचा मासिक पाळीसारखा देहधर्मही सुटत नाही. दुकानांमधील इतर मालासोबत सॅनिटरी नॅपकिनही खराब झाले. आता करायचे काय? नेमकी हीच गरज ओळखून राजेश सोनावणे यांनी हजारो पॅड, स्त्री-पुरुषांची अंतवस्त्रे रायगड आणि चिपळूणमध्ये पाठवले आहेत.
राजेश, आमचा शाळकरी मित्र. अभ्यासी गुणवत्तेत यथातथा पण हृदयाच्या श्रीमंतीत मात्र ‘अंबानी’. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही आपापल्या नशिबाच्या शोधात निघालो, पण हा मात्र तिथेच राहीला. बरेच ‘चतुर’ इतरांपेक्षा पुढे गेल्याच्या आभासी आनंदात ‘रम’ले, पण आमचा हा ‘रेंचो’ मात्र pic.twitter.com/LqwlfMNbYM
— Raj Gandre (@RajGandre) July 28, 2021
मनसेचे धारावी विभाग अध्यक्ष राजेश सोनावणे यांच्या या कार्यात उपविभाग अध्यक्ष विजय भाऊ पोळ, सचिव विनय कदम, शाखा अध्यक्ष संदिप कवडे, रमेशकुमार, मनसे वाहतूक सेना चिटणीस नितीन दिवेकर, उपचिटणीस प्रशांत शिखरे, बेस्ट कर्मचारी सेना उपचिटणीस किशोर माने, जनहित विधी चिटणीस नितीन सोनावणे तसेच महाराष्ट्र सैनिक बबन सुर्य तळ किरण चव्हाण, पदमानाभन, इमरान यांचा सहभाग होता.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
पूरग्रस्तांसाठी ‘मनसे’ मदत
- पुरुष अंतर्वस्त्रे ५०००
- महिला अंतर्वस्त्रे १५००
- लहान मुलांचे अंतर्वस्त्रे १२००
- बनियन पुरुष २०००
- सानिटयर पड १५००
- लहान मुलांचे डायपर १०००
- टुथब्रश १०५०
- महिलांना साड्या ७००
- गाऊन ५००
- चादर २००
- ब्लाऊज पिस ३५०
- बिस्कीट बाक्स २६०
- पुरुष दाढी करण्याचे किट ४५०
- मिनरल वॉटर २५०००हजार ब्लॉटल
- म्मगी २२००पीस
- कपड्यांचे साबण १८००
- अंगाचे साबण १७००
- कुरकुरे २००
- तांदूळ ४०० किलो
- धान्याचे किट ६००
- चप्पल २००
- खारी १५०किलो
- बटर२००किलो
- टोस्ट ५० किलो
- महिला जिन्स २५०
- पुरुष जिन्स २००