मुक्तपीठ टीम
आगामी निवडणुकीसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. आगामी मनपा निवडणुकांना राजकारणात आपल्या प्रभावाच्या पुनरागमनाची संधी म्हणून मनसे गंभीरतेने पाहत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, नाशिक, मुंबईकडे लक्ष देणार आहे. त्यातही सध्या नाशिक आणि पुणे या दोन बालेकिल्ल्यांना पुन्हा मनसेचं प्रभावशाली अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे शहराच्या तीन दिवसाच्या दौर्यावर आले आहेत, तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे हेही सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
मनपा निवडणुकीसाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी
• ठाणे दौरा करून राज ठाकरे पुन्हा एकदा तीन दिवसीय पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
• आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचतील. ते स्वत: पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत.
• या दौऱ्यात ते एकूण ९ मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.
• या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहेत.
• राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता.
अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर
• राज ठाकरेंनी अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी सोपवल्याची चर्चा सुरु आहे.
• गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच सक्रिय झाले आहे.
• आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
• आज दुपारी ते नाशिकमध्ये पोहोचतील. यावेळी ते पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील.
• शहरातील एकंदर राजकीय परिस्थिती तसेच विविध वार्डांची स्थिती, असा एकंदर आढावा घेऊन त्याचा अहवाल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवणार आहेत.
अमित ठाकरेंवर नाशिक मनपाच्या जबाबदारीची शक्यता
• अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता.
• त्यानंतर आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.
• नाशिक मनपाच्या निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत.
• त्यामुळे अमित ठाकरेंवर नाशिक मनपाची जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे.