मुक्तपीठ टीम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत आहे. राज्यातील कडक निर्बंध आणि काही प्रमाणातील लसीकरण यामुळे ते शक्य झाल्याचे मानले जाते. आता निर्बंधात सूट मिळण्याची शक्यता असली तरी मुंबई लोकलचा प्रवास मात्र सर्वसामान्यांना लवकर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
संदीप देशपांडेंचे ट्वीट
संदीप देशपांडेंनी ट्विट करत ही मागणी केली आहे. ते म्हणाले की,महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 25, 2021
मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लादल्याने गर्दी टाळता आली व कोरोनाचा संसर्ग न होण्यात त्याची मोठी मदत झाली, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. मात्र ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल आणि मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मनसेने केली आहे.