मुक्तपीठ टीम
अमरावती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केले आहे. राणांच्या या आव्हानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहे. सर्व शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले असून राणांना मातोश्रीसमोर येऊ दाखवावे असे प्रतिआव्हान दिले आहे. यावर आता मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे.
मनसेने शिवसेनेला डिवचलं…
- शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
- “मातोश्रीचा दरारा असा होता की, समोरचा नुसता थरथर कापायचा.
- पण आता मातोश्रीच्या आत राहणारे थरथर कापायला लागले आहेत…!!!
- या शब्दात शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
- किर्तीकुमार शिंदेंनीही यावर ट्वीट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
- जेव्हा बाळासाहेब होते, तेव्हा ‘मातोश्री’तून नुसता फोन आला, कुणाला बोलावलं तर समोरच्याच्या मनात धडकी भरायची!
- आता कुणीतरी ‘मातोश्री’वर येणार म्हणून बंगलाधारकांच्या मनात धडकी भरते!! असे म्हणाले
नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप…
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आंदोलन खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केला.
- यानंतर नवनीत राणा यांच्या खारमधील निवासी इमारतीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
- यासंदर्भात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर पोलीस विभाग काम करतोय.