मुक्तपीठ टीम
गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम अनेक होत असतात. मात्र, मुंबईत साजरा झालेला एक कार्यक्रम खऱ्या अर्थानं गांधी विचारांशी नातं सांगणारा होता. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) कामगार वर्गाला चांगल्या सवयी लावण्यासाठी एका खास मोहिम राबवत आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) या मोहिमेत सहभागी झाली आहे. JICA द्वारे प्रदान केलेल्या स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचे वितरण कामगार वर्गाला गांधी जयंतीला करण्यात आले आहे.
अच्छी आदतें म्हणजे चांगल्या सवयी मोहीम आहे तरी कशी?
- JICA मुंबईच्या मेट्रो प्रकल्पातील महत्वाची भागिदार आहे.
- जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA)ने ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
- मेट्रोच्या बांधकामात सहभागी कामगारांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी अच्छी आदतें म्हणजे चांगल्या सवयी ही मोहीम राबवली जात आहे.
- या मोहिमेचा एक भाग म्हणून या कामगारांना स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचे वितरण केले जात आहे.
एमएमआरसी मुख्यालयात व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरु करण्यात आली. त्यावेळी आर. रमण, कार्यकारी संचालक (नियोजन), एमएमआरसी; नागई शिंसुके, वरिष्ठ प्रतिनिधी आणि तागुची युसूके, प्रतिनिधी, JICA उपस्थित होते.
चांगल्या सवयी लावण्यासाठी मोहिमेत नेमकं काय करतात?
- JICA ने चांगल्या सवयींबद्दल बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम सुरु केली आहे.
- संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी चांगल्या स्वच्छता पद्धतींचे महत्त्व कामगार वर्गाला पटवून दिले जात आहे.
- हात धुणे, नखे स्वच्छ करणे, आणि इतर स्वच्छता पद्धती जसे की योग्य प्रकारे मास्क घालणे हे सर्व कामगारांना शिकवले जाते.
- JICA- समर्थित फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चरमधील बांधकाम साइट्सवर फ्रंट-लाइन कामगारांना स्वच्छता संबंधित साहित्य प्रदान केले जात आहे.
चांगल्या सवयींची मोहीम काळाची गरज – रणजीत सिंह देओल
”JICA द्वारे चांगल्या सवयींच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीची ही मोहीम हे सध्याच्या काळातील एक उदात्त पाऊल ठरेल. चांगल्या स्वच्छता पद्धती, विशेषतः कोरोना साथीच्या काळात अशा सवयींचे पालन करणे फार महत्वाचे आहे. रोगांना दूर ठेवण्यासाठी चांगल्या स्वच्छता पद्धती शिकवणे आवश्यक आहे. त्या मोहिमेत सहभागी होण्याची दिल्याबद्दल आम्ही JICA चे आभारी आहोत, असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल म्हणाले.