Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास येत्या दीड वर्षात पूर्ण करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

September 14, 2022
in सरकारी बातम्या
0
मा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची जे एन पी टी कांदळवन क्षेत्र जमीन हस्तांतरण बैठक 1

मुक्तपीठ टीम

मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या १८ महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.            

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासामध्ये मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या या पहिल्या अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर – दक्षिण) किनारपट्टीचा समावेश करण्यात येणार आहे.            

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेला हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट १५, २०२० मध्ये घोषित केलेल्या Project Dolphin या दूरदर्शी उपक्रमाला अनुसरून असून त्यामुळे देशातील नद्या व खाड्यांमधील डॉल्फिनच्या संरक्षण व संवर्धनात मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हा प्रकल्प सुरु होणार असून कांदळवन प्रतिष्ठान आणि कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन (CCF) स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाचे अभ्यास क्षेत्र उत्तरेकडील वैतरणा नदीच्या मुखापासून सुरू होऊन दक्षिणेकडील ठाणे खाडी तसेच बृहन्मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्र किनारा व्यापेल. या क्षेत्रामध्ये बॅक बे, हाजी अली आणि माहीम खाडी यांसारख्या अनेक खाड्या तसेच एमएमआर क्षेत्रामधील मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा या पाच नदीच्या मुखांचा समावेश असेल, जे डॉल्फिन आणि पॉरपॉइज या दोन प्रमुख  प्रजातींच्या अधिवासाचा अभ्यास करतील.


Tags: coastal marine mammalsCoastal StudyForest Minister Sudhir Mungantiwarकिनारपट्टीवनमंत्री सुधीर मुनगंटीवारसमुद्री सस्तन प्राणी
Previous Post

मुंबईतील शासकीय वसतीगृह, महाविद्यालयांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

Next Post

Cybernetik announces Global Partnership Program to collaborate with companies across the globe in robotics and process automation

Next Post
Dr. Mahesh Wagle - Cybernetik.jpg

Cybernetik announces Global Partnership Program to collaborate with companies across the globe in robotics and process automation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!