Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करणार – एकनाथ शिंदे

'नरेडको' आयोजित 'महाराष्ट्र रिअल इन्स्टेट फोरम २०२२'

April 29, 2022
in सरकारी बातम्या
0
Minister Eknath Shinde at Maharashtra Real Estate Forum 2022

मुक्तपीठ टीम

बांधकाम क्षेत्र हे शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील सर्व अडचणी नगरविकास विभागाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दिली. बांधकाम क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘नॅशलन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल‘ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नरेडको महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम २०२२‘ या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्र रिअल इन्स्टेट फोरम 2022 2            

कोरोना लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच क्षेत्रांना बसला तसा तो बांधकाम क्षेत्राला देखील बसला, अनेक विकासकांची परिस्थिती या काळात अतिशय अवघड झालेली होती. त्यामुळे या काळात या क्षेत्राला दिलासा देण्याची गरज होती. बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकांना मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. तसेच विकासकाकडून आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम मध्ये देखील ५० टक्क्यांनी कपात केली. या निर्णयाचा मोठा फायदा विकासकांना मिळाला तर सरकारच्या महसुलात देखील मोठी भर पडली. तसेच मुद्रांक शुल्क माफ झाल्याने वाचलेल्या पैशातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरातील लागणाऱ्या काही वस्तू घेता येणे शक्य झाले, असेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

            

नगरविकास विभागाने ३ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात लागू केलेल्या युनिफाईड डिसीपीआरमुळे संपूर्ण राज्यात बांधकामासाठी समान नियम लागू झाले. तसेच या तरतुदींमध्ये इमारतींची उंची वाढवण्याची मर्यादा देखील शिथिल करण्यात आली तसेच एफएसआय देखील मुबलक प्रमाणात वाढवून देण्यात आला. या सगळ्यांचा मोठा फायदा राज्यातील विकासकांना झाला. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी देणारे हे निर्णय ठरल्याने या कार्यक्रमात शिंदे यांना बांधकाम व्यावसायिकांनी उभे राहून मानवंदना दिली.  बांधकाम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेली ही कृती पाहून मंत्री एकनाथ शिंदे पुरते भारावून गेले त्यांनी अत्यंत विनम्रपणे या सन्मानाचा स्वीकार केला. तसेच यापुढे देखील या क्षेत्राचा विकासासाठी असेच सहकार्य करत राहू, अशी ग्वाही दिली.

            

राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील नगरविकासमंत्र्यांनी यावेळी घेतला. मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात तयार होत असलेले ३३७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे भविष्यात उपयुक्त ठरेल. शहरांतर्गत असलेले रस्ते मोठे करणे करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी न्हावा -शेवा सी लिंक असेल किंवा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प असेल, किंवा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर तयार होत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे शहरातील अंतर कमी होणार आहे. तसेच या सर्व प्रकल्पामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून त्याचा बांधकाम क्षेत्राला देखील मोठा लाभ होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

             

ठाणे शहरात देशातील पहिला क्लस्टर प्रकल्प साकारला जात असून या प्रकल्पाद्वारे दीड हजार हेक्टर जमिनीवर संपूर्णपणे सुनियोजित असे नवे शहर साकारले जाणार आहे. ठाणे महानगरपालिका तसेच सिडकोच्या वतीने आम्ही हा प्रकल्प साकारत असलो तरीही नरेडकोच्या सदस्यांनी देखील त्यात नक्की सहभागी व्हावे त्यांना नक्की इतर सवलती नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            

‘नरेडको‘चे अध्यक्ष संदीप रूणवाल, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, प्रख्यात वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर आणि ‘नरेडको महाराष्ट्र‘ चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.


Tags: Eknath ShindeMaharashtra Real Estate Forum 2022mumbaiNAREDCOनरेडकोमहाराष्ट्र रिअल इन्स्टेट फोरम २०२२
Previous Post

सोशल पॉवर! ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना मोटर सायकल!

Next Post

जे घडतंय…खरंतर बिघडतंय…ते पटत नसल्याचं सांगायचंय? हे करा!

Next Post
Voice of Dissent

जे घडतंय...खरंतर बिघडतंय...ते पटत नसल्याचं सांगायचंय? हे करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!