Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या बांधकाम नियमावलीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार

- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

March 17, 2021
in सरकारी बातम्या
0
EKNATH SHINDE

मुक्तपीठ टीम

     राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल. तसेच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती प्राप्त होईल, असे प्रतिपादन नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

  येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये लोकमत माध्यम समुहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सितारमन यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा, लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा मंचावर उपस्थित होते.

 

       कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री शिंदे यांना गौरविण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीचा समर्थपणे सामना करण्यात येत आहे. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देवून राज्याच्या अर्थचक्रालाही गती ‍देण्याचे काम सुरु आहे. नगर विकास विभागाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स) परवानगी देवून राज्याच्या विकासाला गती देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडूनही या कार्यात राज्याला सहकार्य मिळेल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

  आज प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारामुळे कामाची दखल घेतल्याचा आनंद आहे. कारोना काळात आपल्यासोबत अहोरात्र कार्य करणा-या बृह्नमुंबई मनपा, एमएमआरडीए,सिडको, ठाणे मनपासह अन्य शासकीय यंत्रणातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा सन्मान असून त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

     कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम करीत असलेल्या डॉक्टर्स ,नर्सेस यांचे मनोबल वाढविणे गरजेचे होते. तसेच जनसामान्यांच्या विविध तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक होते म्हणून जनतेसोबत मैदानात उतरून काम केले. बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे १५ दिवसात एक हजार खाटांचे जंबो हॉस्पिटल उभारले. आवश्यक तिथे रेकॉर्ड वेळेत फिल्ड हॉस्पिटल उभारली. गरजूंना जेवण दिले. परराज्यातील मजुरांना स्वगृही पाठविले. यासर्व कामांमध्ये सरकारी व गैरसरकारी यंत्रणांनी मोलाचे योगदान दिल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

 

  यावेळी बृह्नमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाले, उद्योजक तथा पेटिएमचे संस्थापक विजय शर्मा, जे.एस.डब्ल्यु उद्योग समुहाचे सज्जन जिंदल यांना सन्मानित करण्यात आले.


Tags: ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कारबांधकाम मंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

‘ती’ मर्सिडिझ सचिन वाझेंच्या वापरातील…पांढऱ्या वेशभुषेतील संशयास्पद व्यक्तीही वाझेच!

Next Post

#व्हाअभिव्यक्त मोदी सरकार सरकारी कंपन्या विकून खरंच देश विकतंय?

Next Post
disinvestment modi

#व्हाअभिव्यक्त मोदी सरकार सरकारी कंपन्या विकून खरंच देश विकतंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!