मुक्तपीठ टीम
धुळे -बंदरे व खनिकर्म खात्याचे मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या हस्ते आज कासारे गावात विकास कामांचा उद्घाटन झाले मात्र या उद्घाटनाप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांना काळे रुमाल दाखवत निषेध व्यक्त केला आहे. तर ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
नामदार दादा भुसे यांच्याकडे कृषिमंत्री पद असतांना शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते मात्र पंचनामे होऊनही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत निषेध व्यक्त केला आहे..
धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, कांद्याला योग्य तो भाव मिळावा, अशा विविध मागण्याही शेतकऱ्यांनी यावेळी केल्या आहेत….
मंत्री दादा भुसे यांच्या समोरच शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनेतून आक्रोश व्यक्त केला.
या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते….