मुक्तपीठ टीम
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीकेचा मारा केला आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका केली आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एमआयएमवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमची ऑफर ही प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यातील कल्पना असल्याचं म्हटलं आहे.
अतुल लोंढे कडाडले, एमआयएम धर्मनिरपेक्ष कुठे?
- एमआयएम हा धर्मनिरपेक्ष नाही.
- त्यांच्याबरोबर गेलं तरच मुस्लीम मते मिळतील हा त्यांचा दावा चुकीचा.
- मुस्लीम मते ही एमआयएमची ठेकेदारी नाही.
- जे धर्मनिरपेक्ष भूमिकेत त्यांना ती मते मिळतील.
- एमआयएम ही भाजपाची बी टीम म्हणूनच काम करते.
- बिहार, यूपी निवडणुकीतून ते दिसून आले.
- त्यांचा डाव महाराष्ट्रात यशस्वी होवू देणार नाही.
नितेश राणेंची शिवसेनेवर मुस्लीम अनुनयाचा आरोप
- नितेश राणे म्हणाले की, एमआयएम हा कट्टरतावादी पक्ष आहे.
- टोकाची भूमिका घेतो.
- ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते.
- टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते.
- एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे.
- सध्या एका एमआयएम या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही आयसीसला ही आवडणार.
- आता आयसीसबरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे.
- उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही आयसीसबरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय.
- एवढेच राहिलेले आहे. करून दाखवलं, याचा खरा अर्थ आज शिवसेनेने महाराष्ट्रासमोर करून दाखवला.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी फटकारले
- एमआयएम आम्हालाऑफर देऊच शकत नाहीत.
- शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत.
- संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत.
- ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं.
- आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे.
- आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे.
- एमआयएमशी त्यांचं आतून टायअप झालं असेल. अशा वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक होईल आणि आघाडी तुटेल, असा डावपेच आखला आहे.
- देवेंद्र फडणवीसजी खूप बुद्धीवादी आहेत.
- त्यांच्याच डोक्यातील ही कल्पना आहे.
- त्यांचा हा बी प्लॅन आहे.