मुक्तपीठ टीम
सध्या तरुणाईमध्ये व्हिडीओ गेमची पसंती वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीला लक्षात घेऊन टेन्सेंट कंपनीने आपल्या व्हिडीओ गेममधील त्रुटी दूर करण्यासाठी फेशिअल रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच मुलांमध्ये ऑनलाइन गेम्सचं व्यसन वाढू नये यासाठी मिडनाइट पेट्रोल फिचर लाँच केले आहे.
मुलांमध्ये ऑनलाइन गेम्सचं वाढत व्यसन
• मुलांना कितीही ऑनलाइन गेमपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यासाठी ते काही ना काही चोरवाट शोधतातच.
• त्यामुळे मुले आणि किशोरवयीन मुलांचे स्क्रीनिंग टाईम कमी करण्यासाठी आणि गेमच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी कंपनीने लॉगिंग नियम आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
• एक इंटरनेट टेक कंपनी असूनही टेन्सेंट ही काळजी घेत आहे, कारण पालकांच्या सक्तीमुळे अशा गेम्सपासून मुलेच दुरावली, कायद्याने बंदी आली तर मोठे नुकसान होईल, जसे भारतात काही चीनी अपबाबत झाले.
• त्यामुळे स्वत:च समस्येवर उपाय म्हणून समस्या तयार होण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न असावा.
मिडनाइट पेट्रोल फीचर लॉन्च
• १८ वर्षांहून कमी वय असणाऱ्या मुलांना रात्री १० वाजेपासून ८ वाजेपर्यंत व्हिडीओ गेम खेळण्यास मनाई आहे.
• मात्र, मुलं व्हिडीओ गेम खेळण्यासाठी पालकांचा डिव्हाइस आणि त्यांचा यूजर आयडीचा वापर करु खेळू शकतात.
• मुलांचे हे प्रयत्न यापुढे यशस्वी होणार नाहीत.
• कंपनीने यासाठी मिडनाइट पेट्रोल फीचर लॉन्च केले आहे.
• कंपनीने याची टॅगलाइन ‘बच्चो, अपने फोन दूर रखो और सोने जाओ’ असे ठेवले आहे.
फीचर लॉन्च होताच कंपनी वादाच्या भोवऱ्यात
• फीचर लॉन्च होताच चीनमध्ये इंटरनेट प्लॅटफॉर्मद्वारे घेतल्या जाणाऱ्या अनुचित फायदा आणि गोपनियतेच्या जोखमींविषयावर सर्वत्र वाद सुरु झाले आहेत.
• काही लोक या फीचरच्या बाजूने आहेत.
• त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे मुलांमधील इंटरनेटच्या अतिवापरास टाळण्यास मदत होईल.
• तर काहींनी या फीचरला तीव्र विरोध केला आहे.
नव्या मिडनाइट पेट्रोल फीचर बद्दल
• टेन्सेंट कंपनी ६० मोबाइल गेममध्ये मिडनाइट पट्रोल फीचरची सुरुवात करत आहे.
• यात व्हिडीओ गेम खेळाडूंमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ‘ऑनर ऑफ किंग्ज’ या गेमचाही समावेश आहे.
• या गेमचे १० कोटीहून जास्त यूजर्स आहेत.
• मुलांसाठी ठरवून दिलेल्या कलावधीनंतर त्यांनी घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या आयडीवरुन गेम खेळण्याचा प्रयत्न केल्यास फेशिअल व्हेरिफिकेशनच्या तपासणीच्या माध्यमातून त्यांची चलाखी पकडली जाईल.
• त्यांना गेम खेळण्यापासून रोखले जाईल.