Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्यान्ह भोजन योजनेत बाजरीसारख्या भरड धान्यांचा समावेश

February 8, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Mid-day meal plan

मुक्तपीठ टीम

जुनं ते सोनं असं म्हणतात. पूर्वी आवडीनं खाल्ली जाणारी बाजरीसारखी भरड धान्य गव्हामुळे मागे पडली. आता मात्र शालेय मुलांच्या मध्यान्ह भोजनात याच सर्वोत्तम पोषक अशा भरड धान्यांच्या समावेश झाला आहे.

 

मुलांचे पोषण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना भरड धान्यांचा , ज्या जिल्ह्यांमध्ये बाजरी सारखी भरड धान्ये खाणे ही सांस्कृतिक दृष्ट्या स्वीकारलेली खाद्य सवय आहे, त्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने पीएम पोषण योजनेंतर्गत भरड धान्यांच्या समावेशाबाबत चाचपणी करण्याची विनंती केली आहे. बाजरी (भरड धान्य) आधारित मेनू आठवड्यातून एकदा असावा आणि बाजरीच्या पाककृती लोकप्रिय करण्यासाठी खानसामे किंवा मदतनीसांमध्ये पाककृती स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली आहे.

 

बाजरीच्या पोषक तत्वांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी छोट्या चित्रफिती तयार करून त्या शाळांमध्ये दाखवून शाळा व्यवस्थापन समित्या (SMC) आणि पालक शिक्षक सभेत (PTM) बाजरीच्या वापरावर चर्चा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
नीती आयोग पीएम पोषण योजनेमध्ये बाजरीच्या समावेशाला प्रोत्साहन देत आहे आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशच्या प्रशासनांबरोबर राष्ट्रीय स्तरावर चर्चा करत आहे. या चर्चेदरम्यान ओदिशा , तेलंगणा आणि कर्नाटकमधील बाजरीच्या वापराशी संबंधित सर्वोत्तम पद्धती इतर राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाबरोबर सामायिक केल्या आहेत.

 

या योजनेत गहू, तांदूळ आणि भरड धान्य या ३ प्रकारचे अन्नधान्य पुरवले जाते. वार्षिक कृती आराखडा आणि अंदाजपत्रक (AWP&B) यामध्ये आवश्यकतेनुसार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे प्रस्तावित अन्नधान्यांचे वितरण केले जाते आणि योजनेच्या कार्यक्रम मंजुरी मंडळाने याला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संमतीने अन्नधान्याचे दोन वर्षातून एकदा वितरण केले जाते. अन्नधान्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे .
शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coarse grainsConsent to the Department of School Education and LiteracyDepartment of Food and Public Distributiongood newsMid-day meal planmilletmuktpeethअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागगहूचांगली बातमीतांदूळबाजरीभरड धान्यमध्यान्ह भोजन योजनामुक्तपीठशालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
Previous Post

राज्यात नवे रुग्ण ६ हजार ४३६! १८ हजार ४२३ रुग्ण बरे! मुंबईत फक्त ३५६!!

Next Post

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी, सौंदर्यीकरणासह सोयी-सुविधा

Next Post
mtdc

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी, सौंदर्यीकरणासह सोयी-सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!