मुक्तपीठ टीम
एका पॉवर बॅकच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एमआयने त्यांची जास्त क्षमतेची पॉवर बँक बाजारात आणली आहे. एमआयच्या या बूस्ट प्रो पॉवर बँकमध ३०,००० एमएएच बॅटरी असून वेगवान चार्जिंग व्यतिरिक्त पॉवर डिलिव्हरी (पीडी) ३.० फिचर देण्यात आले आहे. याशिवाय शॉर्ट सर्किटपासून संरक्षणासाठी १६ लेअर सर्किट संरक्षण देण्यात आले आहे. एमआय पीडी ३.० च्या मदतीने या पॉवर बँक २४ वॅट्स चार्ज करून ७.५ तासात पूर्णपणे चार्ज होईल. या पॉवर बँकमध्ये लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.
एमआय बूस्ट प्रो पॉवर बँकची किंमत:-
- एमआय बूस्ट प्रो पॉवर बँक क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून विकली जात आहे.
- सध्या या पॉवर बँकची किंमत २,२९९ रुपये आहे.
- परंतु नंतर त्याची किंमत ३,४९९ रुपये असेल.
- हे ब्लॅक कलरच्या व्हेरिएंट मध्ये आढळेल.
एमआय बूस्ट प्रो फीचर्स:-
- ५००० एमएएच बॅटरी असल्यास आपण सुमारे ५ ते ६ वेळा मोबाइलवर आणि २ ते ३ वेळा टॅब्लेट चार्ज करू शकता.
- तुमच्या घरी जर सारखी लाईट जात असेल तर, तर ही पॉवर बॅक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
- एमआय बूस्ट प्रो पॉवर बँकेत दोन यूएसबी, एक टाइप-ए आणि एक यूएसबी टाइप-सी असलेली तीन पोर्ट आहेत. तीन पोर्ट्स असणे एकाच वेळी हाय स्पीडसह तीन डिव्हाइसला एकाच वेळी चार्ज करू शकते.
- त्यामध्ये एक स्मार्ट चिप आहे जी लहान गॅझेट्स चार्ज करण्यासाठी स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट फिचर्स सह डिव्हाइसनुसार ऑटोमॅटिक चार्जिंग मेथड मॅच करते. यासाठी दोनदा पॉवर बटण दाबून, पॉवर बँक दोन तास लो पॉवर मोडमध्ये जाईल.
- या पॉवर बँकेमध्ये एक एलईडी स्क्रीन आहे, ज्याद्वारे आपण पाहू शकता की पॉवर बँकेत किती चार्जिंग बाकी आहे.
३०,००० एमएएच बॅटरी पॉवर बँक आणि त्यांची किंमत
- ऑकी पॉवर बँक – ५,९५५
- पोमिक्स पॉवर बँक – ९९९
- अँकर पॉवर बँक – ३,०२९