मुक्तपीठ टीम
मुंबई म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात, त्याचे कारण रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि लोकल ट्रेनमधील तुफान गर्दी. आता मात्र आकारास येत असलेल्या मेट्रोसेवेमुळे मुंबईकरांचे जीवन सुसह्य होणार आहे. तसेच मुंबईत प्रवास करणं हा मजा वाटणारा आरामदायी अनुभव ठरु शकणाराय. मुंबमुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो तीनचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मेट्रो मार्गावर २६ मेट्रो स्टेशन आहेत. येथिल पश्चिम उपनगरांना थेट दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो तीनचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मेट्रो मार्गावर २६ मेट्रो स्टेशन आहेत. त्यापैकी १६ मेट्रो स्टेशन आणि ७ स्थानकांचे सिव्हिल वर्क ७० ते ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यताय. विशेष म्हणजे ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सेवा आहे. त्यामुले स्वाभाविकच अपघातांचे प्रमाणही कमी असेल.
भुयारी मेट्रो जास्त सुरक्षित
- इतर वाहतुकीच्या तुलनेत, अंडर ग्राउंड मेट्रोमुळे अपघात होण्याची शक्यता कमी आहे.
- लोकलच्या उंच प्लॅटफॉर्मचा धोका असतो, कारण रुळांवर पडणाऱ्या लोकांना परत चढताना त्रास होतो.
- लोकल प्रवासातली गर्दी कमी करण्यासाठी अंडर ग्राउंड मेट्रोचे नियोजन आखले जे वेगाने चालू आहे.
भुयारी मार्ग जवळपास पूर्ण
- टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि इतर उपकरणांच्या मदतीने जवळपास संपूर्ण मार्ग तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत बोगद्याचे काम १००% पूर्ण होईल.
- आत्तापर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे ९७ टक्के बोगदे आणि सुमारे ७० टक्के सिव्हिल वर्क झाले आहे.
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो
- मुंबईतील पहिली अंडर ग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान ३३.५ किमीमध्ये बांधली जात आहे.
- मेट्रो-३ जमिनीपासून २० मीटर खाली बांधली जात आहे.
- ह्यात २६ मेट्रो स्टेशन आहेत, त्यापैकी १६ मेट्रो स्टेशन आणि ७ स्थानकांचे सिव्हिल वर्क ७० ते ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.
काम पूर्ण झालेली स्थानकं
- एमआयडीसी स्थानकाचे सर्वाधिक सिव्हिल काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.
- सीप्झ स्थानकाचे ८३ टक्के तर विधानभवन स्थानकाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- मरोळ नाका स्थानक ८२ टक्के, सिद्धिविनायक स्थानक ८० टक्के, कफ परेड स्थानक ८२ टक्के, चर्चगेट आणि हुतात्मा चौक स्थानकाचे काम ८१ टक्के पूर्ण झाले आहेत.
- मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, वरळी, सहार रोड, डोमेस्टिक एअरपोर्ट स्थानक या भागात जवळपास ८० टक्के नागरी कामे झाली आहेत.
- सीएसएमटी, दादर, सायन्स म्युझियम, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी या स्थानकांची कामे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत.
- उशिरा काम सुरू झाल्यामुळे गिरगाव स्थानकाचे बांधकाम सर्वात कमी २९ टक्के झाले आहे.