मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी मार्गावर मेगा ब्लॉकचे नियोजन केले आहे. त्यामुळे काही मार्गांवर रेल्वे वाहतूक बंद असेल तर काही ठिकाणी बदल असतील.
कोणत्या मार्गावर कधी?
मध्य रेल्वे
• ठाणे- कल्याण अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत
• सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान मुलुंड येथून सुटणारी डाऊन धिम्या /अर्धजलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून वेळापत्रकपेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
• कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणारी अप धीम्या /अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्टेशन येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या गाड्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
हार्बर मार्ग
• पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (बेलापूर / नेरुळ-खारकोपर सेक्शन सह)
• अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणा-या सेवा व
• डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान बेलापूर/पनवेल करीता सुटणा-या सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर मार्ग
• अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ठाणे करीता पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणा-या सेवा आणि
• डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल करीता ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणा-या सेवा रद्द राहतील.
बीएसयू मार्ग
• बीएसयू अप मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत नेरुळ/बेलापूरसाठी सुटणारी सेवा आणि
• बीएसयू डाऊन मार्गावर नेरुळ/बेलापूरसाठी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणारी सेवा रद्द राहतील.
सेवा उपलब्ध
• ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशी विभागात विशेष गाड्या चालवल्या जातील.
• ब्लॉकच्या कालावधीत ठाणे- वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.