मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना संकटाची भीषणता वाढत असल्याने आता सेलिब्रिटीही सरकारविरोधात बोलू लागले आहेत. प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्रा गेले काही दिवस सरकारविरोधात आग ओकत आहे. तिने तिच्या दोन नातेवाईकांच्या कोरोनाने मृत्यूनंतर संताप व्यक्त केला आहे. मीराचे ट्विट सरकारवर आग ओकणारे आहे. तिने त्यात म्हटलंय, “त्यांचा मृत्यू कोरोनाने झालेला नसून अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे झाला आहे”. तिने याआधीही थेट भाजपाला टॅग करत प्रश्न विचारला आहे की, “संकट आल्याने आम्ही मदतीसाठी पुढे येऊच, पण गेल्या वर्षी पीएम केअर निधीत जमा झालेले ३ हजार कोटी गेले कुठे?”
पीएम केअरमध्ये जमा झालेले ३ हजार कोटी गेले कुठे?
आता संकट आले आहे. मदतीसाठी पुढे येऊच. पण गेल्य वर्षी पीएम केअर फंडात जमा झालेले तीन हजार कोटी गेले कुठे?
I know we r out donating again. But what happened to 3000 odd crores that was collected in #PMCaresFund last year which was made just for #COVIDEmergency. Where is that money?? Coz the entire nation donated that time too. @BJP4India
— meera chopra (@MeerraChopra) April 30, 2021
मीरा चोप्राचे आरोग्य सुविधांवर आक्षेप
- मी माझ्या दोन भावांना कोरोनामुळे गमावले नाही तर त्यासाठी वाईट आरोग्य सुविधा जबाबदार आहेत.
- माझ्या पहिल्या चुलतभावाला बंगळूरूमध्ये सुमारे दोन दिवस आयसीयू बेड मिळाला नाही.
- दुसर्याची ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला.
- दोघेही ४० वर्षांचे होते.
- ही फार दु:खद बाब आहे की, ‘त्यांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू शकलो नाही.
- पुढे काय होईल याची मला सतत भीती वाटते.
- प्रत्येक आयुष्य संपत चाललं आहे असं दिसतं आहे.
- आपण आपल्या परीने सर्व काही करतो, परंतु तरीही आपण त्यांना गमावतो.
- ‘मला खूप राग येत आहे आणि मला असे पहिल्यांदा वाटत आहे की माझा देश कचराकुंडीत जात आहे.
- आपण रुग्णालयात ऑक्सिजन, इंजेक्शन्स, औषधे आणि बेडची व्यवस्था करू शकलो नाही.
My cousin died in banglore yeaterday. His oxygen dropped and he couldnt get an #ICUBed for 24 hrs. He became extremely breathless and by the time he got a bed, his lungs collapsed.
Is this a covid death or a murder??
He died bcoz we are medically handicapped bcoz our government— meera chopra (@MeerraChopra) April 29, 2021
भारत गरीब नाही…
परदेशी माध्यमं भारतासारख्या गरीब देशांना मदत केली पाहिजे, असे म्हणत आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की भारत गरीब नाही. आमच्याकडे खूप पैसा आहे. सेंट्रल विस्टा, पुतळे यासाठी आम्ही खूप पैसे खर्च करू करतो.
— meera chopra (@MeerraChopra) April 30, 2021
माध्यमांवरही संताप
मीरा चोप्राने प्रसार माध्यमांविरोधातही संताप व्यक्त केला आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीतील कोरोनाबद्दलची सर्व मते वगळून फक्त सनसनाटी भाग चालवला गेला. तिने पत्रकारितेच्या दर्जा आणि हेतूंवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
Death of news media and evolution of spineless, heartless and remorseless journalism!!
Cc: @priyankachopra @zoom i expected better frm you. @pinkvilla @bollywood_life @htTweets @timesofindia @ndtv @ZeeNews @JagranNews @CNNnews18 @Bollyhungama @EconomicTimes pic.twitter.com/V85SrSvliA— meera chopra (@MeerraChopra) April 29, 2021