Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवर अलर्ट: मुंबईत गोवरची साथ, मृत्यूही! अशी ओळखा लक्षणं…

November 16, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
measles-outbreak-in-mumbai

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांनो जरा सावधान, कारण मुंबईत गोवर रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. यामुळे गोवरची लक्षण काय आणि लहान मुलांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

​गोवर रोग काय आहे?

  • गोवर हा वेगाने पसरणारा संसर्ग आहे.
  • या आजारास इंग्लिश मध्ये मिजल्स किंवा रुबीयोला असे म्हटले जाते.
  • गोवर हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये होणारा मृत्यूचा एक प्रमुख कारण आहे.
  • हा आजार हवेतून एका माणसापासून दुसरीकडे पसरू शकतो.
  • हा विषाणू प्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो आणि नंतर खोकला किंवा सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो.
  • गोवरचा उद्रेक दर २ ते ३ वर्षांनी दिसून येतो आणि शेवटच्या उद्रेकात सुमारे १.४ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.

​गोवरची लक्षणे-

  • गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग असल्याचे सिद्ध होऊ शकते.
  • यामध्ये १०४ अंशांपर्यंत उच्च ताप
  • खोकला
  • वाहती सर्दी
  • लाल डोळे किंवा पाणीदार डोळे
  • गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर
  • सीडीसी म्हणते की जेव्हा संक्रमित मुलामध्ये गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात तेव्हा २ ते ३ दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात.
  • त्याच वेळी, ३ ते ५ दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात.
  • गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानांवर, खोडावर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकते.
  • क्षणं सोबत रुग्णाला भूक न लागणे, थकवा जाणवणे, हात पाय दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.

गोवर झाल्यानंतर काय करावे?

  • मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे २ डोस दिले जातात.
  • पुरेसा आराम करावा.
  • संक्रमितांपासून दूर रहावे.
  • पाणी आणि ज्यूस प्यावे.
  • मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करावे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्यावे.
  • बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.

मुंबईत गोवर कसा पसरला?

  • मुंबईत गोवर रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे.
  • कमी वेळेत २९ अधिकृत प्रकरणे समोर आली आहेत.
  • यातील बऱ्याचशा मुलांना पुरळ, ताप आणि डोळ्यांतून पाणी वाहणे आदी लक्षणे दिसून आली.
  • या २९ बाधित मुलांपैकी सुमारे ५० टक्के मुलांना गोवरची लस देण्यात आली आहे.
  • त्यापैकी काही मुलांना ९ महिन्यांपेक्षा कमी वयात गोवरची पहिली लस देण्यात आली होती.

गोवरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची नेमणुक!!

  • गोवरच्या या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची नेमणुक करण्यात आली आहे.
  • सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी उपाययोजना तसेच मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी राज्य आरोग्य यंत्रणेला ही तज्ज्ञांची समिती मदत करणार आहेत.
  • डॉ अनुभव श्रीवास्तव, उपसंचालक (IDSP)आणि NCDC चे उपसंचालक श्री अनुभव श्रीवास्तव या समितीचं नेतृत्तव करत आहेत.
  • या समितीमध्ये नवी दिल्लीचे लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागीय कार्यालय, पुणे येथील तज्ज्ञांचाही समावेश आहे.

Tags: Govarmumbaiआरोग्यगोवरमुंबई
Previous Post

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – दीपक केसरकर

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Mukta Peeth, Happened - Happened, Mumbai-Pune Expressway, Missing Link Project, Chief Minister Eknath Shinde

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!