मुक्तपीठ टीम
सलमान खानचा शो ‘बिग बॉस १६’ ची सुरुवात चांगली झाली आहे. चित्रपट निर्माता साजिद खान टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये सामील झाल्याच्या बातम्यांनंतर ‘MeToo’ची चर्चा पुन्हा सुरू झाली असून किमान दोन महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. साजिद खान चार वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. १ ऑक्टोबर रोजी प्रीमियर झालेल्या ‘बिग बॉस’चा स्पर्धक म्हणून तो टेलिव्हिजनवर परतला.
साजिद खानच्या एन्ट्रीवर सिमरन सुरीचा आक्रोष!… तर शर्लिन चोप्राचा आरोप
- साजिद खान रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये दिसल्याची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्री सिमरन सुरीने म्हटलं की, “मी अस्वस्थ आहे आणि कुठेही लक्ष केंद्रित करू शकत नाही.”
- साजिदने २०१३ मध्ये आलेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान सिमरनला कपडे उतरवण्यास सांगितले होते. असा आरोप तिने केला होता.
- ५१ वर्षीय साजिद खानने तिच्यासमोर असभ्य वर्तन केल्याचा दावा अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे.
२००९मध्ये ‘बिग बॉस’ ची स्पर्धक असलेल्या शार्लिन चोप्राने साजिद खानवर आरोप करत म्हटलं की, “आज आपण जे पाहतोय ते म्हणजे विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला ‘बिग बॉस’द्वारे प्लॅटफॉर्म दिला जात आहे. हे पाहून खूप वाईट वाटते.”
४ वर्ष काम न मिळाल्याने साजिद रडला!
- शोमध्ये एन्ट्रीच्या निमित्ताने साजिदने सलमानसोबत अनेक गोष्टींवर चर्चा केली.
- हमशकल्स आणि हिम्मतवाला यांसारख्या अयशस्वी चित्रपटांची त्यांनी खिल्ली उडवली. तसेच ‘हाऊसफुल’ सारख्या हिट फ्रँचायझीमधून तो कसा बाहेर फेकला गेला हे देखील सांगितले.
- पण या सगळ्यात साजिदवर झालेल्या गंभीर लैंगिक छळाच्या आरोपांवर कोणीही चर्चा केली नाही.
- साजिदने सलमानला सांगितले की, माझ्याकडे फारसे काम नाही. गेली चार वर्षे मी घरी बसलो आहे. म्हणून जेव्हा कलर्स टीमने मला बोलावले तेव्हा मी ठरवले की मी येथे यावे.”
- यावर सलमानने त्याला ज्या कलाकारांसोबत काम केले आहे त्यांची आठवण करून दिली.
साजिद खानवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती
- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने खानला पाठिंबा दिला.
- साजिद खानवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने एक वर्षाची बंदी घातली होती.
- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज म्हणाले, “साजिद खानने आयएफटीडीए आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला सहकार्य केले आहे आणि लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या निर्णयांचे पालन केले आहे.”