Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रबिया…एक सुफी…खरी मुक्त स्त्री!

April 23, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Mayur Joshi On Rubi

मयूर जोशी

खालील मुस्लिम सुफीबद्दल खरोखर वाचा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप जबरदस्त कथा आहे या व्यक्तीची. स्त्री मुक्ती किंवा स्वतंत्रतेवर बोलणाऱ्या व्यक्तींसाठी खास आहे हे. खरी मुक्त स्त्री किंवा खरी स्वतंत्रता म्हणजे काय…ते वाचावे.

 

सुफी पंथांमध्ये माझ्या खूप असे आवडते सुफी संत आहेत. मला सर्वात जास्त भावणारी सुफी म्हणजे रबिया-अल-बसारी किंवा रबिया-अल-अदाविया.

 

रबियाचा जन्म सातव्या शतकामध्ये झालेला प्रेषित मोहम्मद नंतर लगेचच. इराक मधील बसारा शहरांमध्ये इसवीसन 717 मध्ये हिचा जन्म झाला. अत्यंत गरीब असे घराणे होते तिचे.

 

लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला. एका शहरातून दुसऱ्या शहरात मध्ये जात असताना लुटारूंच्या एका टोळीने यांचा काफिला लुटला. त्यामध्ये ही नऊ ते दहा वर्षांची असलेली मुलगी हिलादेखील पळवून नेले. तिला जोर जबरदस्ती करून विकण्यात आले. पुढील कैक वर्षे रबियाने नाच गाणे व इतर जी काही कामे याचबरोबर करावे लागतात ते सर्व केले.

 

रबिया ही दिसायला अत्यंत सुंदर होती असे म्हणतात. तिचा आवाज व तिचे नृत्य हे तेथील लोकल ठिकाणी प्रसिद्ध होते. तिच्या आवाजामध्ये एक जादू होती. एके दिवशी गाणं गात असताना राबियाला अचानक जाणवले की, ते एक गाण्याची प्रेरणा किंवा ते गाणे आतून येत आहे आणि इतक्या intensity ने येत आहे की ते आपले नाहीये. थोडक्यात तिला स्वतःच्या ती परमेश्वराचा अथवा स्वतःची जाणीव झाल्याचा अनुभव आला. त्या दिवशीपासून तिने कोणासाठीही न गाण्याचा किंवा न नाचण्याचे आणि आपले शरीर न देण्याचा निर्णय घेतला. प्रचंड मारहाण झाली छळ झाला परंतु तिने काहीही मान्य केले नाही. आपल्या निश्चयावर ठाम राहिली.

 

आता ती काही कामाची नसल्यामुळे तिला परत एकदा विकण्यात आली. तिला एका मध्यमवयीन गृहस्थाने घर कामासाठी विकत घेतले. हा गृहस्थ मारहाण करणारा किंवा छळ करणारा नव्हता. त्यामुळे रबिया थोडीफार स्वस्थतेने राहू लागली.

 

एके दिवशी रात्री तिच्या मालकाने राबियाच्या खोलीमध्ये तिला प्रार्थना करताना पाहिले. सतत परमेश्वराचा धावा करत असलेली रबिया त्याने पाहिली. तिच्या शरीराभोवती पसरलेल्या तेज आणि त्यामुळे त्या खोलीत असलेला प्रकाश पाहून त्याला आश्चर्यही झाला आणि तो घाबरला देखील. इतक्या महान माणसाकडून मी माझी कामे करून घेतोय याचा त्याला पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी त्याने रबियाला सांगितले की तू आज पासून या कामापासून मुक्त आहेस. मी तुला माझ्या बायकोचा दर्जा देऊ इच्छितो तरीदेखील तुझी इच्छा काय आहे ती मला सांग.

 

राबियाने त्याचे आभार मानले व त्याला सांगितले मला पूर्णतः मुक्तता हवी आहे. ना मला कोणाकडे कामासाठी आणि ना बायको म्हणुन राहायचे आहे. तर मला तुम्ही पूर्णपणे जायची मुभा द्या.

 

त्या माणसाने ही कोणतीही अडवणूक न करता तिला स्वतंत्र केले. साधारणतः तिचे वय त्यावेळेस 30 ते 40 या दरम्यान असावे. यानंतर ती जवळपास 80 वर्षांपर्यंत जगली. परंतु पूर्णतः एकटी. तिने फक्त परमेश्वराचा धावा करत आयुष्य जगले. तिच्या कविता इतक्या पॉवरफुल आणि सामर्थ्यशाली आहेत. ती तिच्या जुन्या घरांमध्ये जिथे तिचा जन्म झाला होता तिथेच राहिली. ते घर पूर्ण पडलेले होते.

 

पुढे इतकी सुंदर स्त्री एकटी फक्त परमेश्वराचा धावा करीत अशा पडक्या घरात राहते आहे ही बातमी जशी पसरली गेली लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शन करता येऊ लागले. परंतु तिने कधीही कोणालाही थारा दिला नाही. क्वचितच फार कमी लोकांची ती स्वतः बोलली.

 

तिची एक कविता आहे ज्यामध्ये ते स्वतःचाच एक अनुभव सांगते. ती म्हणते की मी एका हातात पाण्याने भरलेली बादली आणि एक हातामध्ये मशाल घेऊन निघाले. लोकांनी विचारलं रबिया कुठे निघालीस. मी म्हणाले तुमच्या नरक्या संकल्पनेमध्ये खूप जास्त आग आहे जी तेथील जीवांना त्रास देते त्या नरकावर या बादलीतील पाणी ओतून शांत करणार आहे. आणि जो स्वर्ग सर्वांना सुख आणि शीतलता देतो त्या स्वर्गाला या मशालीने आग लावणार आहे.

 

म्हणजेच स्वर्ग आणि नरक यापेक्षा खरा परमेश्वर खूप वर आहे आणि स्वर्ग नरक हे द्वैत आहे हे तिने जाणले होते. व त्या काळामध्ये जेव्हा इस्लामचा प्रसार अत्यंत जोराने चालू होता त्यावेळेला आपल्या अशा कविता लिहिणे हे काय कमालीचे धाडस आहे. तेदेखील एकटी स्त्री.

 

या महान स्त्रीची साधनसामुग्री ऐकून नवल वाटेल. तिच्याकडे एक फुटके वाडगे ज्यामधून ती खायची आणि झोपताना उशाला आधार मिळावा म्हणून असलेलं एक विटकुर. पूर्ण आयुष्यामध्ये या दोन गोष्टीत ती स्वतःबरोबर ठेवायची. कैक रात्री तिने परमेश्वराचे नामस्मरण करत लागलेले आहेत त्या देखील तिने कवितेमध्ये सांगितल्यात. ती परमेश्वराला आळवून म्हणते मी कित्येक रात्र झोपलेले नाहीये मला कधी तरी तुझा आवाज ऐकव.

 

तेव्हाच्या काळामध्ये अजून काही सुफी संत होते त्यापैकी एक अत्तार. त्याची आणि राबिया यांची ओळख होती. तेव्हाच्या काळातील काहीच श्रीमंत पुरुषांनी रबी आला तिच्या प्रसिद्धीमुळे आणि तिच्या प्रचंड सौंदर्यामुळे लग्नाची मागणी घातली होती. परंतु तिने या सर्व मागण्या धुडकावून लावल्या.

 

इतके हालाखीचे आयुष्य लहानपणापासून जगल्यानंतर ही करारी स्त्री ज्या पद्धतीने उभी राहिली. पूर्ण आयुष्य एकटी राहीली. तिच्यातील करारीपणा, तिच्यातील धाडस, तिच्यातील स्वतंत्रता पाहिली की मला फक्त तिच्या चरणाची धूळ कपाळास लावावीशी वाटते. आजच्या जमान्यातील स्त्री मुक्तीची भाषा करणाऱ्या स्त्रिया, त्यासाठी विविध ऍडव्हर्टाईस करणाऱ्या नायिका यांना बघून मला त्यांची खुप कीव येते.

 

खरी स्वतंत्र असलेली स्त्री ही नेभळटपणाने आपला अधिकार मागत फिरत नाही हे रबीया च्या गोष्टीवरून मी शिकलो. सातव्या शतकामध्ये मुस्लिम देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हिस्त्री इतक्या ठामपणे उभी राहते व सुफी पंथांमधील सर्वप्रथम स्त्री सूफी पंथ हे पद तिला मिळते.

 

खूप जवळची वाटते मला रबिया गुरुंसारखी प्रचंड भावते माझ्या मनाला.

 

ज्या कोणी स्त्रिया किंवा मुली आज स्वतंत्रतेची भाषा करतात त्यांनी एकदा तरी रबियाला वाचावे. खरी हिम्मत खरा अटीट्युड काय असतो हे त्यांच्या लक्षात येईल.

 

मलादेखील एकटे राहण्याची ताकद देणाऱ्या व्यक्तीनपैकी रबिया ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि ती स्त्री असल्यामुळे आणि त्यात अशा पद्धतीने एकटी राहिल्या असल्यामुळे प्रेरणेचा स्त्रोत आहे. पूर्ण आयुष्य मानसिक रित्या आणि भावनिकरीत्या आणि शारीरिक दृष्ट्या देखील कोणावरही अवलंबून न राहता स्वतः कसे जगता येते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रबिया. माझी लायकी तिच्या चरणाच्या धुळी इतकी देखील नाही परंतु तिच्यातून काही ना काही घेऊनच आयुष्यात पुढे जाईन हे नक्की.

 

तिचे जबरदस्त करारीपण आणि मानसिकता दाखवणारी ही एक कविता

I’am fully qualified to work as a doorkeeper, and for this reason

What is inside me, I don’t let out

What is ouside me, I don’t let in

If someone comes in, he goes right out again,

He has nothing to do with me at all

I’am a doorkeeper of the heart, not a lump of wet clay

 

तरी आता या महान स्त्रीच्या पायावर डोके ठेवून हा लेख पूर्ण करतो.

Mayur Joshi

(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)

ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999


Tags: Mayur JoshiRabiyaWomenमयूर जोशीरबियासुफीस्त्री
Previous Post

निमित्त राणागिरीचं, मनसेनं शिवसेनेला डिवचलं, आता बंगल्यातलेच थरथरतात!

Next Post

#मुक्तपीठ #Live शिवसेना वरचढ, राणांची माघार! न केलेल्या हनुमान चालिसा पठनानंतर राणा LIVE

Next Post
#मुक्तपीठ #Live शिवसेना वरचढ, राणांची माघार! न केलेल्या हनुमान चालिसा पठनानंतर राणा LIVE

#मुक्तपीठ #Live शिवसेना वरचढ, राणांची माघार! न केलेल्या हनुमान चालिसा पठनानंतर राणा LIVE

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!