मयूर जोशी / व्हा अभिव्यक्त!
अद्वैत वेदांत किंवा अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष ब्रम्ह किंवा परमेश्वर म्हणजे आपण स्वतः आहोत. व आत्ता या क्षणी देखील तेच सत्य आहे. परंतु मग साधना किंवा अध्यात्मिक उपासना या गोष्टींची गरज काय? जर का मी मुक्त आहे तर अजून कोणते मुक्ती मिळवणार??
गाढवाची साधना
अद्वैत वेदांत किंवा अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष ब्रम्ह किंवा परमेश्वर म्हणजे आपण स्वतः आहोत. व आत्ता या क्षणी देखील तेच सत्य आहे. परंतु मग साधना किंवा अध्यात्मिक उपासना या गोष्टींची गरज काय? जर का मी मुक्त आहे तर अजून कोणते मुक्ती मिळवणार??
— The Lone Wolf (@mayurjoshi999) April 21, 2022
गौडपाद म्हणजे शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरू. त्यांनी लिहिलेल्या मांडुक्य कारिका या ग्रंथामधील एक श्लोक असे सांगतो की उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टी मिथ्या असतात. उत्पत्ती मिथ्या आहे आणि लय देखील. बंधन मिथ्या आहे आणि मुक्ती देखील. अध्यात्मिकता मिथ्या आहे आणि आणि अध्यात्मिक साधन देखील.
हे सर्व वाचले की आपल्यासारखे लोक उतावळेपणाने हे म्हणायला सुरु करू शकतात की मग अध्यात्मिक साधना करण्यात काय पॉईंट?? मी जर का प्रत्यक्ष ब्रह्म आहे तर मग मी साधना करून साधणार तरी काय?
त्यासाठी एक सुंदर गोष्ट आहे.
एका गावात एक धोबी राहायचा. सकाळी गावातून कपडे घ्यायचा आपल्या गाढवावर टाकायचा आणि मग नदीवर कपडे धुण्यासाठी निघून जायचा. गाढव एका झाडाखाली बांधून ठेवायचा. परंतु एके दिवशी मजा अशी झाली की त्यांनी गाढवाची दोरी आहे ती घेण्यासाठी तो विसरला होता.
घरी जाऊन परत दोरी आणणे हे फार कठीण. तेवढ्यात गावातील एक विद्वान मनुष्य बाजूने जात होता. याला विचारात पडलेला बघून त्याने विचारले अरे काय झाले?
धोबे म्हणाला, “गाढवाची दोरे घरी विसरलो आहे आता परत आणायला जावे लागणार.”
विद्वान मनुष्य म्हणाला, “अजिबात काळजी करू नकोस ज्या झाडाखाली त्या गाढवाला बांधतो तिथे जा आणि हातात दोरी आहे असे समजून गाढवाला बांध. म्हणजे फक्त एक्टिंग कर की तू गाढवाला बांधत आहेस.”
धोबी म्हणाला, ” इतकेच”??
विद्वानाने मान डोलावली.
धोब्याने गाढवाला झाडाखाली नेले व नेहमी
ज्याप्रमाणे त्याला बांधतो अशी खोटी खोटी बांधायची एक्टिंग केली. विद्वान निघून गेला होता.
धोबी कपडे धुताना हळूच मागे बघत होता गाढव गायब तर झाले नाही ना? गाढव निवांतपणे त्याच्याकडे बघत किंवा इकडे तिकडे बघत गवत खात शांतपणे उभे होते.
कपडे धुऊन झाल्यावर धोब्याने गाढवाला हाक मारली. “सोन्या चल घरी.”
सोन्या कुठला जागचा हलतोय?? तो मालकाकडे बसला बघत टुकुर टुकुर… आता काय करायचं हा धोब्याला प्रश्न पडला. परत परत हाक मारून देखील गाढव काही जागचे हलेना.
धोबी गेला गावात पळत त्या विद्वानाच्या घरी. त्याला म्हणाला, “माझा सोन्या काय जागचा हालत नाही.” मग विद्वान त्याला म्हणाला, “अरे तूच तर सकाळी त्याला बांधून ठेवला ना.”
धोबी म्हणाला,” मी तर नुसती अक्टिंग केली होती तुम्ही सांगितले तशी.”
विद्वान म्हणाला, ” मग तशीच ॲक्टींग आता दोरी सोडण्याची कर.”
धोबी गेला आणि त्याने गाढवाला नेहमीप्रमाणे सोडण्याची एक्टिंग केली तसे गाढव निमूटपणे त्याच्याबरोबर चालू लागले.
गोष्ट नीट समजली का???
ज्याप्रमाणे न बांधलेल्या दोऱ्याचे बंधन झाले वनो सोडवलेल्या दोरी मुळे मुक्तता झाली.
आपली अवस्था गाढवासारखे असते. मुळात कोणतेही बंधन नसताना आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना आपण बंधन म्हणून त्यात अडकून बसलेले असतो.
त्यामुळे नसलेले बंधन सोडवण्याकरता खोटी खोटी साधना केल्याची ॲक्टींग करावी लागते
म्हणजेच दोरी सोडवण्याची देखील एक्टिंग करायला लागते तर आपण मुक्त झालो असे आपल्याला वाटते.
म्हणून साधना किंवा उपासना ध्यानधारणा याचे महत्त्व आहे. मुळातच आपण त्या गाढवासारखे असल्यामुळे आपल्याला हेच समजत नाही ही कि दोरी बांधलेली च नव्हती.
त्यामुळे आपण देखील त्या बंधनात आयुष्य काढतो. म्हणजेच खरोखर आपण मुक्त आहोत ही जाणे हो आपल्याला होत नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये देहा विषयी मनाविषयी आजूबाजूच्या जगाविषयी आस्था आहे. अटॅचमेंट आहे. तोंडाने कितीही बडबडले की मी स्वतः ब्रह्म किंवा परमेश्वर आहे तरीदेखील
जोपर्यंत ते खरोखर जाणवत नाही तोपर्यंत आपण या दृश्य बंधनात अडकलेले असतो गाढवासारखेच. म्हणून त्या न बांधलेल्या बंधनातून सोडवण्याकरता साधना रुपी खोटी दोरी सोडण्याची गरज लागते.
#mayurthelonewolf
(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)
ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999