मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा करणारा बुधवारी आणखी एक गौप्यस्फोट केला होता. नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या निकाहाचा एक फोटो शेअर केला. यावरून आता समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझीनेच एक गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने निकाह लावूनच दिला नसता, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.
निकाहाच्यावेळी मुलगा मुसलमान आहे की नाही यासाठी फॉर्म भरला जातो
- समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने निकाह लावूनच दिला नसता, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.
- मुजम्मिल अहमद यांनीच २००६ साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता.
- मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात.
- त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो.
- त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही, नंतरच निकाह केला जातो.
- आधीच माहिती घेतली जात नाही.
- माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे.
- आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही, आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.
‘निकाहनाम्यावर समीरचं नाव मुस्लिम का?’
- नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
- डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता.
- या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे.
- याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
- त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता.
- मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा.
- अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही.
- त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली.
- यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी २००६ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. २०१७ मध्ये समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकर या मराठी अभिनेत्रीशी लग्न केले होते.