मुक्तपीठ टीम
गेल्या १४ वर्षात केवळ एकच गोष्ट अशी आहे की जिचा भाव वाढला नाही, ती म्हणजे माचिस. महागाईचा भडका सातत्यानं उडालेला असतानाही माचिस होती त्याच किंमतीत मिळत राहते. पण आता १४ वर्षांनंतर माचिसच्या किमती वाढणार आहेत. ती १ रुपयांनी महाग होणार आहे. पुढील महिन्यापासुन माचिस २ रुपयांना मिळणार आहे. पाच प्रमुख माचिस उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी एकमताने आगपेटीची MRP १ रुपये वरून २ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ डिसेंबरपासून हा नियम लागू केला जाणार आहे. २००७ मध्ये माचिसच्या किमतीत शेवटच्या वेळी सुधारणा करण्यात आली होती, जेव्हा त्याची किंमत ५० पैशांवरून १ रुपये करण्यात आली होती. शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
माचिससाठीचा कच्चा माल भडकला
- कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या अलीकडच्या वाढीमुळे माचिस भाववाढ अपरिहार्य आहे.
- माचिस तयार करण्यासाठी १४ कच्च्या मालाची आवश्यकता असते. उत्पादकांनी सांगितले. १
- एक किलो लाल फॉस्फरस ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचला आहे.
- तसेच मेणाची पेटी ५८ रुपयांवरून ८० रुपये, बाहेरची पेटी फळी ३६ रुपयांवरून ५५ रुपये आणि आतील पेटीची फळी ३२ रुपयांवरून ५८ रुपयांवर पोहोचली आहे.
- कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून वाढल्या आहेत.
- डिझेलच्या वाढत्या किमतींनीही या भारात भर पडली आहे.
आता ६०० माचिसचे बंडल २७०-३०० रुपयांना विकले जात आहे. नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही.एस. सेतुराथायनम यांनी सांगितले की, “उत्पादक ६०० माचिस बॉक्सचे बंडल (प्रत्येक बॉक्समध्ये ५० मॅचबॉक्स) २७० ते ३०० रुपयांना विकत आहेत. आम्ही आमच्या युनिटमधून विक्री किंमत ६०% ने वाढवून ४३०-४८० रुपये प्रति बंडल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १२% जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट नाही.”