मुक्तपीठ टीम
जुने वाहन जर भंगारात काढले तर नवीन वाहनाच्या किंमतीत चांगली सूट मिळणार आहे. त्यामुळे वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्या धोरणाआधीच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने त्यांचे उत्पादन वाढल्याचे जाहीर केले आहे. मारुती सुझुकीचे कार उत्पादन १८ टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
मारुती सुझुकीने फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची उत्पादन आकडेवारी जाहीर केली. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये १,६८,१८० वाहने तयार केली. तर, फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीने १,४०,९३३ वाहने तयार केली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या उत्पादनात १९.३% वाढ झाली आहे. यामुळे त्या कंपनीचे अच्छे दिन आल्याचे म्हटले जात आहे. कारण जानेवारीत कंपनीच्या उत्पादनात दहा टक्के घट नोंदली गेली होती.
किती वाढले फत्पादन
• फेब्रुवारी २०२१ मध्ये १,६५,७८३ युनिट्स उत्पादन झाले, फेब्रुवारी २०२० मध्ये याचे १,४०,३७० युनिट्सने उत्पादन झाले, यात १८ टक्के उत्पादन वाढून फरक पडला.
• फेब्रुवारी २०२० मध्ये ऑल्टो आणि एस-प्रेसोने २९,६७६ युनिट्स उत्पादन केले. तर, फेब्रुवारी २०२० मध्ये याचे २८,२१३ युनिट्स उत्पादन केले. या उत्पादन ४ टक्क्यांनी घट झाली.
• फेब्रुवारी २०२१ मध्ये स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, डिजायर, ग्लान्झा, वॅगनआर आणि बलेनोचे ९१,०९१ युनिट्स उत्पादन झाले. तर फेब्रुवारी २०२० मध्ये याचे ७५,१४२ युनिट्स उत्पादन झाले होते. या उत्पादनात २१.२२% वाढ झाली.
• फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्टिगा, विटारा ब्रेझा, एक्सएल ६, एस-क्रॉस आणि जिप्सीचे ३२,५०१ युनिट्स उत्पादन झाले. तर फेब्रुवारी २०२० मध्ये याचे २१,७३७ युनिट्स उत्पादन झाले होते. या उत्पादनात ३३.११% वाढ झाली.
• फेब्रुवारी २०२१ मध्ये इकोची १२,०३५ युनिट्स विक्री झाली. फेब्रुवारी २०२० मध्ये याची विक्री १०,८५६ युनिट्स झाली होती.
पाहा व्हिडीओ: