मुक्तपीठ टीम
आज २३ मार्च. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या देशाचे वीरपुत्र भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आजच्याच दिवशी १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
शहीद भगतसिंहांचं प्रेरणादायी जीवन
- शहीद भगतसिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला होता.
- ते स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात वाढले असून त्यांचे वडील किशनसिंग, काका सरदार अजित सिंह हे महान स्वातंत्र्यसेनानी होते.
- भगतसिंह हे गदर आंदोलनानंतर क्रांतिकारक झाले.
- १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडमुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि तेव्हा पासून ते स्वातंत्र्याच्या लढाशी जोडले गेले.
- तर वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली.
शहीद राजगुरु यांचा पराक्रम
- शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेडा गावात झाला होता.
- बालपणात वडिलांना गमावल्यानंतर ते वाराणसीला सुंस्कृत शिकण्यासाठी आले होते.
- येथे अनेक क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क वाढला.
- त्यानंतर ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन सैन्यात दाखल झाले.
- त्यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या मनात भीती निर्माण केली होती.
- १९ डिसेंबर १९२८ रोजी राजगुरू यांनी भगतसिंग यांच्यासमवेत सँडर्सवर गोळ्या झाडल्या.
- २८ सप्टेंबर १९२९ रोजी राज्यपालाला ठार मारण्याच्या प्रयत्नात त्यांना दुसर्याच दिवशी पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर नंतर फाशी देण्यात आली.
शहीद सुखदेव थापरांचं शौर्य
- सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी झाला होता.
- ब्रिटिशांच्या क्रूर अत्याचारांनी ते दुखावले गेले आणि त्या कारणास्तव क्रांतिकारकांमध्ये सहभागी झाले होते.
- त्यानंतर ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य बनले.
- त्यांनी पंजाब आणि उत्तर भारतातील क्रांतिकारांसोबत सभा घेतल्या आणि लोकांच्या हृदयात उत्साह निर्माण केला.
- तसेच इतर काही क्रांतिकारकांसह लाहोरमध्ये ‘नौजवान भारत सभा’ सुरू केली.
- लाहोर प्रकरणातही त्यांना शिक्षा झाली होती.
२३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी या भारत मातेच्या तीन वीरपुत्राना फाशी देण्यात आली होती.