कोल्हापूर / उदयराज वडामकर
केंद्र शासनाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे .या पर्वताच्या आजूबाजूच्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. तसेच पारसनाथ अभयारण्याचा एक भाग म्हणजेच जैन धर्माचे पवित्र क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे पावित्र्य नष्ट होणार. त्यामुळे जैन धर्मियाने विरोधाच्या भूमिकेत आज कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.
सकळ जैन समाजाचे श्रद्धास्थान तसेच जैन धर्मियांची पवित्र भूमी असलेले सुमेध शिखरजी हे पर्यटन स्थळ करण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याने तसेच जैन धर्माचे पवित्र स्थळ असल्याने आता हॉटेलवर रिसॉर्ट सुरू करण्यास अनुमती देण्याचाही आली आहे या निर्णयामुळे तीर्थक्षेत्रावर हॉटेल सुरू होतील अशी भीती जैन धर्मियांना आहे त्या निषेधार्थ सकळ जैन धर्माच्या वतीने कोल्हापुरात शिखरजी बचावासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा बिंदू चौक ,शिवाजी चौक, गुजरी ,महाद्वार रोड ,पापाची तिकटी, कार्पोरेशन, सीपीआर,व्हीनस कॉर्नर ,स्टेशन रोड वरून असेंबली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. मोर्चामध्ये जैन समाज नेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेल भट्टारक महास्वामी तसेच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यावतीने हे नेतृत्व केले, तसेच श्रावक, श्राविका हजारो सकळ जैन बांधव यामध्ये सहभागी झाले होते. तसेच आबालवृद्ध महिला व पुरुष तसेच स्त्रियांची संख्या जास्त होती काही महिला लहान बालकांना घेऊन या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या तसेच वयोवृद्ध महिलाही या मोर्चात सहभागी होत्या .