तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
उमेश कुमावत संपादक असलेल्या टीव्ही 9 मराठी न्यूज चॅनलने या आठवड्यात पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे. सतत १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिल्यानंतर मागे गेलेल्या टीव्ही 9 मराठीने गमावलेले स्थान परत मिळवले आहे. मार्केट शेअरमधील १.४ची वाढीने टीव्ही 9मराठीला बळ पुरवलं आहे. तर झी २४ तास १.३ घट झाल्याने दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची कामगिरी सतत ३ आठवडे सुधारत आहे. गेल्या आठवड्यात २० टक्क्यांचा टप्पा ओलांडणाऱ्या माझाने या आठवड्यात २१.२ टक्के मार्केट शेअर मिळवला. चौथ्या क्रमांकावरील साम आणि पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत किंचित मागे गेले आहेत. सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही.
कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?
- हा या वर्षातील २५वा आठवडा आहे.
- या आठवड्यात मराठी चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये झालेला फरक हा रेटिंग सुरु झाल्यानंतर दुसऱ्यांदा झालेला आहे.
- मराठीतील सहा न्यूज चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठी चॅनल पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्यात १.४ची वाढ आहे.
- झी २४ तास आता दुसऱ्या स्थानी आहे. मार्केट शेअर १.३ने कमी झाला आहे.
- तिसऱ्या स्थानावरील एबीपी माझा ०.७ने पुढे गेले आहे.
- चौथ्या स्थानावरील साम या आठवड्यात ०.५ने मागे गेले आहे.
- पाचव्या स्थानावरील न्यूज 18 लोकमत या आठवड्यात ०.३ ने मागे गेले आहे.
- सहाव्या क्रमांकावरीलोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलले आहे. सध्या त्यांचे रेटिंग हे निरीक्षणाखाली आहे. या
- महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ते प्रकाशित करणे सुरु होण्याची अपेक्षा आहे.
(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)
समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…
- मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
- एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
- झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
- सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
- या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
- ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
- याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
- चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
- या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)
खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:
टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा: