Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास पुन्हा नंबर १! माझा, साम, लोकमतच्या मार्केट शेअरमध्ये वाढ!

June 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
TV Rating Week 23

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केट शेअरमध्ये मिळवलेला पहिला क्रमांक झी २४ तासने याही आठवड्यात कायम राखला आहे. तर टीव्ही 9 मराठीचा मार्केट शेअर याही आठवड्यात पुन्हा ०.५ने कमी झाला आहे. तर एबीपी माझा, साम, न्यूज 18 लोकमत या तीनही मराठी न्यूज चॅनलनी मार्केटमधील आपला वाटा वाढवला आहे. टीव्ही 9 मराठीप्रमाणेच लोकशाही या न्यूज चॅनलला या आठवड्यातही नुकसान सहन करावं लागलं आहे.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • हा या वर्षातील २३ वा आठवडा आहे.
  • पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १८वा आठवडा आहे.
  • रेटिंग सुरु झाल्यानंतर गेल्या आठवड्यात प्रथमच मराठी चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये फरक झाला.
  • मराठीतील सहा न्यूज चॅनल्सच्या रेटिंगमध्ये झी २४ तास पहिल्या क्रमांकावर आला, त्यांच्या मार्केट शेअरमध्ये याही आठवड्यात २७.६ आहे.
  • न्यूज चॅनलचं रेटिंग पुन्हा सुरु झाल्यानंतर सतत पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9 मराठी चॅनलने गेल्या आठवड्यात ते स्थान गमावले. ते चॅनल आता दुसऱ्या स्थानी आहे. याही आठवड्यात टीव्ही9मराठीचा मार्केट शेअर ०.५ने कमी झाला आहे.
  • एबीपी माझा चांगली वाढवत नोंदवत ०.८ने पुढे गेले आहे.
  • साम या आठवड्यात ०.३ने पुढे गेले आहे.
  • न्यूज 18 लोकमत याही आठवड्यातही ०.२ने वाढले आहे.
  • लोकशाही सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचा मार्केट शेअर याही आठवड्यात ०.ने ०.८ने कमी झाला आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात पहिल्या क्रमांकावर आता २७.६% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे.
  • १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर असलेले टीव्ही9 मराठी २६.३ मार्केट शेअरसह आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात ०.५ ची घट आहे. गेले काही आठवडे सतत घट आहे.
  • एबीपी माझा १९.४ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.८ची वाढ आहे.
  • साम टीव्हीने ०.३ची वाढ झाली असून १२.५% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे
  • पाचव्या क्रमांकावर १०.३% मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. वाढीत सातत्य आहे.
  • सहाव्या क्रमांकावर ३.९ % मार्केट शेअरसह लोकशाही आहे. त्यांच्यात ०.०८ची घट आहे.

गेल्या १३ आठवड्यांच्या सरासरीत टीव्ही 9 क्र. १

TV9 Rating

(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
    ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:

टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?

गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं रेटिंग…

 

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास नंबर १! टीव्ही 9 मराठी दुसऱ्या क्रमांकावर!

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास नंबर १! टीव्ही 9 मराठी दुसऱ्या क्रमांकावर!


Tags: Marathi News Channelmarathi news channels ratingTRPTV 9TV RatingZee 24 Taasझी २४ तासमराठी न्यूज चॅनल्समराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग
Previous Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक- डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post

अरे व्वा वसंत मोरे! एसटी चालक-वाहकांच्या माणुसकीवर एकाकी महिलेला घरी पोहचवून चढवला कळस!

Next Post
vasant more helps woman in midnight protected by pmpml driver and conductor

अरे व्वा वसंत मोरे! एसटी चालक-वाहकांच्या माणुसकीवर एकाकी महिलेला घरी पोहचवून चढवला कळस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!