तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
मराठी न्यूज चॅनल्समधील नंबर १चं चॅनल कोणतं, यासाठीची स्पर्धा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. २० व्या आठवड्यात टीव्ही 9 मराठी आणि झी २४ तास या दोन चॅनलमधील अंतर आणखी कमी झालं आहे. टीव्ही 9मराठीचा मार्केट शेअर काहीसा कमी होत असला तरी आजही ते चॅनल नंबर १ आहे. पण आता टीव्ही 9 मराठीनंतर असलेल्या झी २४ तासशी असलेलं त्यांचं अंतर एकापेक्षाही कमी टक्क्यावर घसरलं आहे. त्यामुळे जर झी २४ तासची वाढ अशीच सुरु राहिली आणि टीव्ही 9ची घसरणही तशीच राहिली, तर पहिल्या दोन क्रमांकांमध्ये अटीतटीची स्पर्धा टोकाची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्यूज चॅनल्सचं रेटिंग सुरु झाल्यापासून सतत १५ आठवडे टीव्ही 9 मराठीच पहिल्या क्रमांकावर आहे. पण गेले काही आठवडे टीव्ही9चा मार्केट शेअऱ सतत घसरत असतानाच झी २४ तासचा मार्केट शेअर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील चॅनल्समधील अंतर अवघ्या ०.९ टक्क्यावर आलं आहे. एबीपी माझाचीही काहीसी प्रगती आहे. तर न्यूज १८ लोकमत अद्यापही पाचव्या क्रमांकावर पण सतत प्रगतीपथावर आहे. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावरील साम आणि सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीची या आठवड्यातही स्थिती फारशी चांगली नाही.
टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…
- हा या वर्षातील रेटिंगचा २० वा आठवडा आहे.
- पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १५वा आठवडा आहे.
- या आठवड्यातही चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
- मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. पण .१चा फरक आला आहे.
- झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात किंचित पुढे गेलं आहे.
- एबीपी माझा ०.१ ने पुढे गेले आहे.
- साम या आठवड्यातही .३ने मागे गेले आहे.
- न्यूज 18 लोकमत याही आठवड्यातही .१ ने वाढले आहे.
- लोकशाही सहाव्या क्रमांकावर आहे.
कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?
- मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २७.६% मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर २६.७% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे.
- एबीपी माझा १९.३ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.१ची वाढ आहे.
- साम टीव्हीने .३ची घट झाली असून ११.५% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
- पाचव्या क्रमांकावर ९.७% मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.१ची वाढ आहे.
- सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीचा ५.१ % मार्केट शेअर आहे.
(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)
समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…
- मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
- एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
- झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
- सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
- या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
- ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
- याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
- चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
- या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)
खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:
टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा: