Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

February 26, 2022
in घडलं-बिघडलं, विशेष
0
Marathi Bhasa Din

मुक्तपीठ टीम

ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी रविवारी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिननिमित्त मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव व त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भारत सासणे यांच्यासह.  भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  – लोकवाङ्मय गृह, मुंबई, अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी  (व्यक्ती) – डॉ. रमेश वरखेडे, नाशिक, मराठी अभ्यास परिषद, पूणे (संस्था) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार मिळालेली (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत, राहुल नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी चौरंग निर्मित ‘शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

 

पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती

१) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – डॉ.भारत सासणे

  • डॉ. भारत सासणे यांनी कथा, नाटक, एकांकिका, कादंबरी, बालसाहित्य, ललित व श्रुतिका लेखन, चित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • डॉ.भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी ७ पुरस्कार व इतर ३० पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, सांगली येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • डॉ.भारत सासणे यांनी ‘दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.
  • सामाजिक वास्तवाच्या चित्रणात अद्भताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथात्मक साहित्याला विचारपूर्वक कलात्मक आकार दिली.

 

२) श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था – लोकवाङ्मय गृह, मुंबई

  • पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून  सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.
  • ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रह, अशोक केळकरांचा ‘रुजुवात’ हा मराठी समिक्षेचा मानदंड, सतीश काळसेकर यांचे कसदार साहित्य, दहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित ‘निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्र, अशोक शहाणे, अरुण खोपकर, अरुण काळे, प्रतिमा जोशी, जयंत पवार, मनोहर ओक, नितिन रिंढे, अशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.
  •  नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कवि संमेलन, विविध लेखनविषयक स्पर्धा, आपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना  देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.
  •  वि.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे  पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.
  • लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.

३) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)- डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक

  • ‘अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समिक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.
  •  पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.
  • का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरी, पावरा, बंजारा, अहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे ‘समाज भाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.
  • १९ वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण, पंचायतराज, सामाजिक परिवर्तन आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.
  • निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि ‘क्रिटिकल इन्क्वायरी’ या द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.

 

४) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास परिषद, पुणे

  • मराठी भाषेचा सर्वांगीण विकास, लोकव्यवहारात मराठीचा वापर, ज्ञानव्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि मराठीजनांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे या चतु:सूत्रीनुसार मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने ही संस्था चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहे.
  • भाषाविषयक सैद्धान्तिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा तसेच भाषा आणि जीवन यातील विविधपदरी संबंध आणि त्यावरचे भाष्य मांडणारी भाषा या विषयाला वाहिलेले ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक १९८३ पासून आजतागायत सुमारे चाळीस वर्षे प्रकाशित होणारे केवळ मराठीच नव्हे तर सकल भारतीय भाषांतील हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक.
  • कोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यासंबंधी लेखन आणि लेखक यांना पुरस्कार.2018 पासून या पुरस्काराचे नामकरण ‘प्राध्यापक ना. गो. कालेलकर पुरस्कार’.
  • वर्धापन दिनानिमित्त व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद तसेच मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषातज्ज्ञ श्रीमती सत्त्वशीला सामंत स्मृति व्याख्यान’ इ. उपक्रम.
  • त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन, भाषिक नीती आणि व्यवहार, प्रसार माध्यमे आणि मराठीचा विकास, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आदी विषयांवर सकारात्मक मंथन.

 

५) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे

  • कवी, समीक्षक, अनुवादक, अनेक बहुचर्चित मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचे संपादक तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे मोलाचे कार्य केले.
  • १९६६ साली ज्येष्ट भालचंद्र नेमाडे यांच्यासह ‘वाचा’ या लघु नियतकालिकाचे प्रकाशन.
  • हिंदी साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठी साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचे कार्य.
  • दोन हजारहून अधिक कवितांचा अनुवाद, कविता-नाटक-कादंबरी यांच्या अनुवादांचे ४० संग्रह, १० संपादित ग्रंथ, ५ कवितासंग्रह, ५ लेखसंग्रह अशी ग्रंथसंपदा.
  • गेली सात वर्षे ज्ञानपीठ पुरस्कारासाठीच्या अंतिम निवड समितीत परीक्षक तसेच मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मान, कुसुमांजली राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार समित्यांत परीक्षक म्हणून कार्य.
  • महाराष्ट्र शासनाच्या चार पुरस्कारांसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचे पुरस्कार, विविध राष्ट्रीय पुरस्कार आणि अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार.

६) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई

  • मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.
  • शालेय शिक्षणात येणारे मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करून राज्य शासनाला द्विस्तरीय आराखडा सादर.
  • ‘उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा’ हा उच्च शिक्षणात मराठीच्या वापरासंबंधी लक्ष वेधणारा अभ्यासग्रंथ प्रकाशित. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर सर्वत्र मराठी माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ अभ्यासक्रमांचे मराठीकरण.
  • न्यायव्यवहारात मराठीचा वापर व्हावा यासाठी ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ ह्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन करून जिल्हा व तालुका न्यायालय वकील परिषदेत त्याचे वितरण तसेच या संदर्भातील चर्चासत्रांचे आयोजन.
  • माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी संगणकीय मराठीच्या वापराबद्दल कार्यशाळा. राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकात मराठीचा वापर अनिवार्य होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट फलक सर्वमान्य व्हावा,  एमएससीआयटी अभ्यासक्रमात युनिकोड व मराठीचा समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा. त्या संबंधित पुस्तिका प्रकाशित.

Tags: cm uddhav thackerayMaratahi Language dayमराठी भाषा गौरव दिनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

सरकारनं शब्द पाळला नाही, उपोषण करावंच लागलं! – संभाजीराजे छत्रपती

Next Post

स्टोरीटेलचे ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’!

Next Post
Storytel marathi marathi bhasha gaurav din song

स्टोरीटेलचे 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त सर्वांना शुभेच्छा देणारे 'मराठी भाषा गौरवगीत'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!