योगेश केदार
गाजर आंदोलन! कोल्हापूर! अखेर भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांच्या भावना ऐकुन घेतल्या निवेदन स्वीकारले. पण काल एक गोष्ट उशिरा कळली, समाजातल्याच कुणीतरी पोलिसांना टीप दिली होती. ज्यांच्याशी चर्चा केली होती त्यापैकीच कुणीतरी आमचे लोकेशन पोलिसांना सांगितले होते. म्हणून तर पोलीस आम्ही झोपेतून उठायच्या आत रूमच्या बाहेर हजर होते.
आम्ही सर्वांनी खूप विचार केला. आपली टीप पोलिसांना कुठून पोचली असावी? काही तार जुळले सुद्धा. हे आंदोलन होऊच नये, चंद्रकांत पाटलांनी निवेदन स्वीकारू नये. यासाठी रात्री पासून आपल्याच लोकांनी जोरात प्रयत्न केले होते. त्यापेक्षाही पुढे जाऊन हे लोकांना कळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न झाले. असो, हे घडतच असते. त्याशिवाय जीवनात आणि जन आंदोलनात मजा नाही.
असो, आम्ही सामान्य मराठे सुद्धा लय हट्टी! मराठ्यांना ५०%च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण हे एकमेव ध्येय घेऊन मोठमोठ्या लोकांना दखल घ्यायला भाग पाडले आहे! पोलिसांनी ताब्यात घेऊन सकाळ पासून बसवले होते. पोलिसांना आम्ही म्हणत होतो. आम्ही गुन्हेगार आहोत का? आम्ही अजून आंदोलन केले नाही, तुम्ही ताब्यात घेऊ शकत नाही. आम्हाला केवळ निवेदन द्यायचे आहे. पोलिसांना हे बोलत चर्चेत गुंतवत ठेवले. आम्ही रूम सोडलीच नाही.
50% च्या आतील मराठा आरक्षणाची भुमिका सर्वच राजकीय पक्षांच्या राज्य प्रमुखांना समजावून सांगण्यासाठी व वैधानिक आरक्षण मिळवण्यासाठी योगेश केदार व सहकारी सक्रिय आहेत.काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात येणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना घरीच अटकाव केला. 1/3 pic.twitter.com/H0KXWkvSBl
— Golekar Ganesh N. (@golekarganesh) April 5, 2022
शेवटी नमते घेत पोलिसांनी दुपारी मध्यस्थतेची भूमिका घेतली. साडे तीन वाजता पाच जणांचीच भेट घडवून आणली. आम्ही ५०% च्या आतली समाजाची भावना अभ्यासपूर्ण मांडली. सुरुवातीला सर्वच पक्ष बोलतात त्याप्रमाणे दादाही कुणाचे न काढता ५०% वरचे आरक्षण मागा वगेरे बोलले. परंतु आरक्षणाचा संपूर्ण इतिहास त्यांच्या समोर ठेवला. मराठ्यांची फसवणूक कधी, कशी आणि कोणी कोणी केली हेही सांगितले. २०१४ ला काँग्रेस राष्ट्रवादी ने दिलेले आरक्षण हाय कोर्टात सुद्धा टिकले नाही.
त्यांच्या झालेल्या चुका बऱ्यापैकी भाजपा सरकार ने सुधारल्या. कष्टाने मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला मागास ठरवले. जी आरक्षणाच्या लढ्यात पहिली पायरी असते. सगळे व्यवस्थित करून २०१८ मध्ये भाजप कडे संधी असताना सुद्धा तुम्ही ५०% च्या वरचे आरक्षण दिले त्या मुळे अंतिमतः तेही टिकले नाही. हे ठामपने सांगितले.
चंद्रकांत पाटलांनी आम्हाला विचारले , आमच्याकडे राज्यात सत्ता नाही मग विरोधी पक्षाकडून यापुढे नेमकी अपेक्षा काय आहे? आम्ही सांगितले की, आम्ही सत्ताधाऱ्यांना सुद्धा समजावून सांगू. नाही ऐकले तर जोरदार आंदोलने करू. पण जर का सरकारने ५०% च्या आत आरक्षण देण्याची भूमिका घेतली तर मात्र तुम्ही विरोधाला विरोध न करता सहकार्य केले पाहिजे. उलट त्याकामी सकारात्मक भूमिका ठेऊन काम करावे. जर तसे नाही झाले तर मग आम्ही रस्त्यावर बघून घेऊ. आम्ही सर्वच नेत्यांना समजावून सांगत आहोत. सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढायचा आहे.
चंद्रकांत पाटलांची एक शंका होती. जर मराठ्यांना ५०% आत आरक्षण दिले तर महाराष्ट्रात दंगली होतील असे लोक म्हणतात. त्यावर थोडक्यात उत्तर दिले आहेच. पण काही दिवसांनी यावर शास्त्रोक्त पद्धतीने मुद्द्यांची आधारावर उत्तर देऊ. महाराष्ट्रात मराठ्यांचं भलं होत असेल तर त्याविरोधात दंगल होऊच शकत नाही. आरक्षणावरून तर अजिबात नाही. हे सर्वच राजकीय नेत्यांना समजाऊन सांगावे लागेल.
सुनील नागणे यांनी जोरात भावना व्यक्त केल्या. प्रताप सिंह कांचन पाटील, प्रवीण पाटील आणि प्रमोद पाटील यांनीसुद्धा आपापले विचार मांडून समर्थन केले.
(योगेश केदार हे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय मराठा सेवक आहेत. 9823620666)