मुक्तपीठ टीम
कोठडीतील नेत्यांच्या आरोग्य तपासणीचे चोचले, जनसामान्यांसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याकडे मात्र दुर्लक्ष! उपोषण करणाऱ्या नेत्यांच्या तपासणीसाठी राज्य शासनाने डॉक्टर पाठविणे गरजेचे मानले जाते. असे असताना २४ तासांनंतरही युवराज संभाजीराजेंची शासकीय वैद्यकीय तपासणीसाठी एकही डॉक्टर सरकारने पाठविलेला नाही. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा मराठा आंदोलक आणि समाजातून निषेध करण्यात आला आहे. अखेर स्वत: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हात जोडून आवाहन केल्यानंतर आंदोलक काहीसे शांत झाले.
आमचा राजा उपाशी, सरकार खाते तुपाशी…या घोषणांनी आझाद मैदानात आज दुमदुमून गेला. त्याच बरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा झाल्या. त्याचं कारण होतं शनिवारपासून मराठा आरक्षण आणि इतर पाच प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला सुरुवात झाली असूनही राज्य सरकारनं केलेलं दुर्लक्ष. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी सरकारने सकाळपर्यंत कोणतीही व्यवस्था केलेली नाही. आंदोलकांनीच राजांच्या काळजीतून १०८ या रुग्णवाहिका क्रमांकाला कॉल करून बोलवलं. त्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर हे आपण बोलवल्यामुळे आलेत, ते सरकारने पाठवलेले नाही, असं आंदोलकांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राजकारणारे सत्तेतील नेते प्रत्यक्षात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. याचा अर्थ त्यांना मराठा समाजाची कसलीही पर्वा नाही, अशीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ: