मुक्तपीठ टीम
गेले तीन दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे. मात्र त्यांनी कोणतेही औषध घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर मधील दसरा चौकात गेले तीन दिवस साखळी उपोषण केले आहे. दरम्यान त्यांच्या जीवाला काही- बरे वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा कोल्हापूरातून आंदोलकांनी दिला आहे.
गेले तीन दिवस खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर मधील दसरा चौकात गेले तीन दिवस साखळी उपोषण केले आहे. विविध संघटना ,सामाजिक संस्था, तरुण मंडळ यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे . सोमवारी संभाजी राजेंची प्रकृती खालावली आहे.यावेळी त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इरादा जिजाऊ ब्रिगेडने दर्शविला आहे. बुधवारपासून जिल्ह्या जिल्ह्यात उद्रेक होईल त्याचा वनवा महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय राहणार नाही सकल महा मराठा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले.
संभाजीराजेंची किमान ६ मागण्या मान्य करण्याची मागणी!
- गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय.
- महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
- आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.
- त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात.
- या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.
- याआधी देखील असे निर्णय झाले आहेत.
- माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे.
- मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलं, पण समाजाच्या प्रतिनिधींनीच चर्चा करतील. ठरवतील