Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अच्युत गोडबोले यांचे ‘मनात’ आता ऑडिओ बुकमध्ये…संदीप खरे यांच्या आवाजात!

December 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Achyut Godbole's 'Manat' audio book in Sandeep Khare voice

मुक्तपीठ टीम

स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी “मनात”चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉम पर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत – एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या ऑडीओबुक ऐकायला मिळणार आहे. मन म्हणजे काय? मनाचा शोध घेताना, प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला असून प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप खरे यांच्या रसाळ वाणीतून स्टोरीटेल मराठीवर हे ऑडिओबुक ऐकण हा प्रसन्न अनुभव आहे.

देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा लेखक अच्युत गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

अच्युत गोडबोले लिखित “मनात’  या मानसशास्त्रावरील पुस्तकच्या केवळ सात आठवड्यांत सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात ‘मनाचे श्‍लोक’ न वाचलेली व्यक्ती दुर्मिळच असेल. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्‍लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या “मन’ नावाचं प्रकरण लेखकाच्या मनात कायम डोकावल्याचं जाणवतं. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या “मनाच्या’ दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखक अच्युत गोडबोले यांच्या मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ लाभलं आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्‍यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना सहज कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. संदीप खरे यांच्या मधुर आवाजात स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकायला सुरवात करताच श्रोते या श्रवणानंदात पूर्ण गुंगून जातात. हे ऑडिओबुक संपूर्ण ऐकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी “मनात’ या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

‘स्टोरीटेलवर ‘मनाचा ताबा घेणारं हे अप्रतिम’ ऑडिओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

 

स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/manaat-1335489


Tags: Achyut GodboleAudio bookmanatsandeep khareStorytel Audiobookअच्युत गोडबोलेऑडिओ बुकमनातसंदीप खरेस्टोरीटेल मराठी
Previous Post

“जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार”

Next Post

महिलांना सुरक्षारक्षक प्रशिक्षणासाठी ‘झलकारी’ उपक्रम!

Next Post
'Jhalkari' programme for women security guard training

महिलांना सुरक्षारक्षक प्रशिक्षणासाठी 'झलकारी' उपक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!