मुक्तपीठ टीम
तब्बल २४ वर्षांनंतर आज काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्ष मिळला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय झाला आहे. खर्गे यांना ७८९७ मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात १०७२ मते आली. खरगे हे एस निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते तर जगजीवन राम यांच्यानंतर हे पद भूषवणारे दुसरे दलित नेते आहेत. ते गांधी घराण्याशीही जवळचे आहेत.
खरगे नेहमीच नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ
- ५० वर्षांहून अधिक काळ खरगे राजकारणात सक्रिय आहेत.
- खरगे हे नेहरू-गांधी घराण्याशी नेहमीच प्रामाणिक मानले गेले आहेत.
- काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे.
- अलीकडच्या काळात, जेव्हा राहुल आणि सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले होते तेव्हाही ते पुढे आले होते.
- रस्त्यावर निदर्शने करताना ते उपस्थित होते.
खरगे यांच्या समर्थनार्थ G-23 चे अनेक नेते
- एआयसीसी मुख्यालयात खरगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते.
- जी-२३ च्या अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला.
- खरगे यांच्या कागदपत्रांवर अनेक खासदारांनी सह्याही केल्या.
- खरगे हे एस निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आहेत.
- जगजीवन राम यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरे दलित नेते आहेत.
१३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा निवडणूक झाली!!
- काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.
- पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी १९३९, १९५०, १९७७, १९९७ आणि २००० मध्ये निवडणुका झाल्या आहेत.
- यावेळी तब्बल २२ वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.
- त्यांनी सांगितले की, या निवडणुकीनंतर २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा नेता देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडला जाईल.
- याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते.