Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, पॅडी कांबळे आणि कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत धम्माल विनोदी ‘वऱ्हाडी वाजंत्री’!

October 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
वऱ्हाडी वाजंत्री

मुक्तपीठ टीम

दिवाळी संपताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे आणि मिश्कील विनोदाचा शहनशहा विजय पाटकर वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला असून फुल्ल मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर “वऱ्हाडी वाजंत्री”हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. भरगच्च मनोरंजन असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मिडीयावर करण्यात आली आहे.

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी कौटुंबिक विनोदी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पक्का झाला आहे. लवकरच लगीनसराई सुरु होत असल्याने दस्तुरखुद्द विजय पाटकर आपल्या सवंगड्यांसोबत रसिकांसाठी विनोदाचा हा बंपर आहेर घेऊन चित्रपट मंडपाच्या उंबऱ्यावर उभे आहेत. त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या स्वागतासाठी विनोदाचा हुकमी एक्का मकरंद अनासपुरे यजमान म्हणून मिरवणार असून पॅडी कांबळे आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी तो उतावीळ झाला आहे.

लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. लग्नाळू व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा ‘मॅरेज इव्हेंट्स’नी घेतली आणि त्यासोबत ‘शादीराम घरजोडे’ जाऊन ‘सुटाबुटातला मॅरेजगुरु’ डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी – संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धम्माल कम्माल करीत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या…पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय…! आजमितीस या बिलंदर अवलियाने आपल्या भन्नाट अक्कलहुशारीतून ९९ची खेळी पार केलीय … सचिनसारखी सेंचुरी लीलया करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय…. या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी तो चक्क दादासाहेबांची बहीण परी आणि ताईसाहेबांचा भाऊ युवराजला बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास सज्ज झालाय…. असं साधारण कथा बीज घेऊन वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचा संगीतमय विनोदी प्रवास सुरु होतो.

वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या संगीताची लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलेली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.

या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन वैभव अर्जुन परब यांनी लिहिले आहेत तर छायाचित्रण शैलेश अवस्थी यांचे असून संकलक स्व. सलोनी कुलकर्णी, हेमंत गायकवाड आहेत. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर असून वेशभूषा गीता गोडबोले, पोर्णिमा ओक यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले पाटील आहेत. सह दिग्दर्शक मनोज सहदेव माळकर असून विज्युअल प्रमोशन संकलक दिनेश मेंगडे आहेत. साऊंड डिजाईनर शेखर भगत तर पार्श्वसंगीत रवींद्र खरात यांचे आहे. रंगभूषा अजित पवार तर जाहिरात संकल्पना मिलिंद मटकर यांची आहे. प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख राम कोंडू कोंडीलकर असून सोशल मीडिया मार्केटिंग तुषार रोठे पाहत आहेत. ध्वनीमुद्रण सुरेश कचवे यांनी तर पुनॆ: ध्वनिमुद्रक केविन गाला आहेत. स्थिरचित्रण राम वासनिक यांनी तर जाहिरात स्थिरचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे. पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ डीजीटोन येथे करण्यात आले असून चित्रपट वितरक – जयेश मिस्त्री यांची युजेएम नेटवर्क्स एन एन्टरटेनमेंट एलएलपी संस्था करीत आहे.

पाहा:


Tags: Good news Morningmakrand anaspureSwaraj film ProductionsVarhadi VajantriWedding Vibesगुड न्यूज मॉर्निंगमकरंद अनासपुरेलग्नसराईवऱ्हाडी वाजंत्रीस्वराज फिल्म प्रॉडक्शन
Previous Post

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करा!

Next Post

‘एस्सार’तर्फे वॉटर फिल्टर, २ हजार स्वच्छता कर्मचार्‍यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी

Next Post
Essar care

'एस्सार'तर्फे वॉटर फिल्टर, २ हजार स्वच्छता कर्मचार्‍यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!