मुक्तपीठ टीम
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसई पूर्व येथील ३६० एकर भूखंडावर स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणारा हा प्रकल्प नोडल एजन्सी म्हणून म्हाडाने मंजूर केला आहे. या प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेची ७५,९८१ घरे उभारण्यात येणार आहे. त्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७ हजार तर अल्प उत्पन्न गटासाठी १७ हजार घरे मिळणार आहेत, तर उर्वरित ३२ हजार घरांची विक्री विकासक बाजारभावानुसार करणार.
नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती!
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसईतील सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्यानुसार म्हाडाने ‘कॉन्सेप्च्युअल अॅडव्हायरी सर्व्हिसेस एलएलपी’ कंपनीच्या वसई पूर्व येथील सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पास संमती दिली आहे.
- त्यात अत्यल्प उत्पन्न गटातील ४५,१७२ घरे बांधली जाणार असून, २७ हजार घरे म्हाडाने निर्धारित केलेल्या दरानुसार आणि सोडतीमार्फत विजेत्यांना दिली जातील, अशी माहिती ‘म्हाडा’चे मुख्य अभियंता शिवकुमार आडे यांनी शुक्रवारी दिली.
- म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात या प्रकल्पाचे सादरीकरण झाले.
उर्वरित ३२ हजार घरांची विक्री विकासक बाजारभावानुसार करणार!!
- अल्प उत्पन्न गटामध्ये ३०,८२९ घरे बांधली जाणार आहेत.
- त्यापैकी १७ हजार घरे म्हाडाने ठरविलेल्या दराप्रमाणे उपलब्ध करून दिली जातील.
- त्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये एवढा दर निश्चित केला आहे.
- अत्यल्प उत्पन्न गटातील घरे ३०६ चौरस फूट आणि अल्प उत्पन्न गटातील घरे ३२० चौरस फुटांची असतील.
- अत्यल्प गटातील विजेत्यांना पंतप्रधान आवास योजनेनुसार केंद्र-राज्य सरकारची एकत्रित अडीच लाख रुपयांची सवलत दिली जाते.
- अल्प उत्पन्न गटातील घरांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही.
- तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील विजेत्यांना मुद्रांक शुल्काची १ हजार रुपयांची रक्कम द्यावी लागेल.
- त्याचप्रमाणे या योजनेतील उर्वरित ३२ हजार घरांची विक्री विकासक बाजारभावानुसार करणार.
- या घरांमधील अत्यल्प गटासाठी ३१ मे रोजी २,५०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी https://surakshasmartcity.com या वेबसाइटवर इच्छुकांना नोंदणी करता येईल.
१ लाख ४० हजार २१७ घरांचे काम पूर्णत्वास….
- पंतप्रधान आवास योजनेतून राज्यभरात सुमारे १० लाख ६१ हजार ५०३ घरांना मंजुरी मिळाली आहे.
- सध्या १ लाख ४० हजार २१७ घरांचे काम पूर्णत्वास गेले असून, ३ लाख ३२ हजार २७३ घरांची कामे सुरू आहेत.
- तसेच म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ५९,४७१ घरांची कामे सुरू आहेत.