Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

माझी वसुंधरा अभियान २.०: सांगलीचा राज्यात दुसरा क्रमांक, शासनाकडून ७ कोटींचे बक्षीस!

December 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
My Vasundhara Mission 2.0

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान २.० उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमुत गटात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय पटकावला आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत सात कोटींचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील , सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

याबाबत माहिती देताना महापौर सूर्यवंशी म्हणाले की , शासनाच्या माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून माझी वसुंधरा २.० अभियानाअंतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेमध्ये राज्यातील ४०६नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सहभाग घेतला होता. १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत गटात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला होता मात्र याबाबतच्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आलेली नव्हती आज याबाबत शासनाकडून आलेल्या परिपत्रकामध्ये माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला अमृत गटासाठी ७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच या बक्षीस रकमेमधून मनपा क्षेत्रात निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, त्याचबरोबर मनपा क्षेत्रात मिवावाकी वृक्षारोपण , अमृतवने , स्मृतीवने , शहरी वने बटरफ्लाय गार्डन , सार्वजनिक उद्याने , जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल , रोपवाटिकांची निर्मिती , जलसंवर्धनाचे उपक्रम , रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी , तळे व नाले यांचे पुनर्जीवन करणे, सौंदर्यकरण करणे उपक्रम हाती घेणे नूतनीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत्रांचा वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना हाती घेणे, सौर उर्जेवर चालणारे एलईडी , दिवे याला प्रोत्साहन देणे , विद्युत वाहनांना प्रोत्साहन चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देणे आणि माझी वसुंधरा अभियांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात यावी अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत असेही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

महापालिकेला माझी वसुंधरा अभियानातून येणाऱ्या बक्षीस रकमेतून जास्तीत जास्त महापालिका क्षेत्र हरित करण्याचा आमचा सर्वांचा मनोदय असून पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम नजीकच्या काळामध्ये हाती घेण्यात येतील तसेच पर्यावरण पूरक अनेक गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. पुढील स्पर्धेमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ही प्रथम स्थानावर येण्यासाठी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्यासह मनपाची सर्व टीम , सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक तसेच मनपा कर्मचारी , एनजीओ हे सर्व प्रयत्नशील राहतील आणि पुढील स्पर्धेत आपली महापालिका राज्यात प्रथम क्रमांक पटकावले असा विश्वास सुद्धा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार बैठकीस मनपा उपायुक्त राहुल रोकडे , महापालिकेच्या समाज कल्याण सभापती अनिता व्हनखंडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान , नगरसेवक योगेंद्र थोरात, मनगू आबा सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिकेच्या आयइसी टीमचे विशेष योगदान

महापालिकेला राज्यात मिळालेल्या यशामध्ये महापालिकेच्या आयइसी टीमचे विशेष योगदान आहे. या टीमने आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, उपक्रम, योजना हाती घेतल्या व त्यांचे योग्य रित्या सादरीकरण शासनाकडे केले. यामुळेच अमृत गटात महापालिकेचा दुसरा क्रमांक येण्यास मोठी मदत झाली. यामध्ये आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सिटी समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, स्नेहलता वर्धमाने, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी , वैष्णवी कुंभार, शिवम शिंदे, सिधिक पठाण, विश्वराज काटे यांच्यासह टीमने विशेष काम केले.

मनपाच्या विविध विभाग, एनजीओचा सहभाग

माझी वसुंधरा अभियानातील यशामध्ये मनपा आरोग्य, विद्युत, उद्यान, जलनिस्सरण, शिक्षण, बांधकाम, नगररचना, अग्निशमन या सर्व विभागाच्या खाते प्रमुख आणि टीमने तसेच सर्व एनजीओ आणि आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनीही भरीव काम केले आहे.


Tags: good newsGovernment of MaharashtramuktpeethMy Vasundhara Mission 2.0sangliSangli Miraj Kupwad City Municipal Corporationघडलं-बिघडलंचांगली बातमीमहाराष्ट्र शासनमाझी वसुंधरा अभियान २.०मुक्तपीठसांगलीसांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका
Previous Post

भारतात वाहनांच्या विक्रीत तुफानी वाढ, एका महिन्यात २३ लाखांहून अधिक वाहनांची विक्री!

Next Post

घराच्या छतावर सोलर बसवा, केंद्र सरकारच्या योजनेतून ४० टक्के अनुदान मिळवा!

Next Post
solar power,

घराच्या छतावर सोलर बसवा, केंद्र सरकारच्या योजनेतून ४० टक्के अनुदान मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!