मुक्तपीठ टीम
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. सध्या आंदोलन स्थळी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, मंत्री, आमदार दाखल झाले आहेत. मात्र, सकाळपासून यामिनी जाधव, सचिन अहिर वगळता कुणी नसल्याने वेगळीच चर्चा रंगली. काही वेळाने सुभाष देसाई आले.
शिवसेनेचे प्रमुख नेते आंदोलनात गैरहजर
- नवाब मलिकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत.
- उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सप्रिया सुळे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत.
- तर शिवसेनेकडून केवळ उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार यामिनी जाधव आणि सचिन आहिर हे उपस्थित आहेत.
- हे वगळता शिवसेनेचा प्रमुख नेते आंदोलनात सहभागी झालेले नाहीत.
- शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह उत्तर प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर गेलेले आहेत.
- तर अनिल परब हे भराडी देवी यात्रेला गेले आहेत.
नवाब मलिकांना ८ दिवसांची ईडी कोठडी
- ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
- अंडरवर्ल्डशी संबंधित लोक आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले होते आणि याचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, असा दावा ईडीने केला.
- यानंतर न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.