मुक्तपीठ टीम
महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडतर्फे महिंद्रा ट्रीओ हे आपले इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा महाराष्ट्रात मिळणार आहे. या ई-रिक्षाची मुंबईत किंमत २ लाख ९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाजारपेठेतील ६७% हिश्शासह महिंद्रा ट्रीओ ही भारतातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक तीनचाकी ऑटो आहे. महिंद्रा ट्रीओ आपल्या मालकाला पाच वर्षांत दोन लाख रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी मिळवून देणार आहे. या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या ऑटोमध्ये सर्वोच्च ८ केव्ही पॉवर आणि १२.७ डिग्रीची चढण चढण्याची उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम क्षमता आहे.
ट्रीओ ही महिंद्रा फायनान्सच्या सहाय्याने केवळ ४१,५००.०० रुपयांचे कमी डाऊन पेमेंट करून आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केवळ १०.८% कमी व्याजदराच्या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महिंद्रा ट्रीओवर ग्राहक ७५००.०० रुपयांच्या आकर्षक एक्स्चेंज बोनसचा लाभ देखील मिळवू शकणार आहेत.
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या धोरणामुळे महाराष्ट्राने या आधीच इलेक्ट्रिक परिवहन क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. आज महिंद्रा ट्रीओच्या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील ध्वनीमुक्त आणि प्रदूषणमुक्त दळणवळणाकडे जाणारा शेवटचा टप्पा देखील परिवर्तीत होण्यास मदत होईल याची आम्हाला खात्री आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाची** विक्री साध्य करणारी इलेक्ट्रिक ऑटो असलेली ट्रीओ पाच वर्षांत २ लाख रुपयांपर्यंतची बचत साध्य करून अनेकांच्या जीवनात सुधार आणण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.
महिंद्रा ट्रीओची ठळक वैशिष्ट्ये
- भारतातील सर्वाधिक विक्री होणारा इलेक्ट्रिक लि-आयन तीनचाकी प्लॅटफॉर्म
- आतापर्यंत १३००० हून अधिक इलेक्ट्रिक तीनचाकींची विक्री
- निमो (NEMO) मोबिलिटी प्लॅटफॉर्ममुळे वाहनाची रेंज, जिओ फेन्स यावर दूरस्थ पद्धतीने लक्ष ठेवणे, वेग, लोकेशन आणि अन्य कित्येक बाबींवर लक्ष ठेवणे शक्य
- दोन लाख रुपयांपर्यांची सर्वाधिक बचत
- सीएनजी ऑटोच्या तुलनेत ट्रीओ पाच वर्षांत दोन लाख रुपयांपर्यंतच्या इंधनाची बचत करून देते (६३.९ प्रती किलो डिसेंबर २०२१ मधील इंधनदरानुसार)
- महिंद्रा ट्रीओचा देखभाल खर्च केवळ ५० पैसे प्रती किलोमीटर इतकाच आहे.
- लिथियम आयन बॅटरीला देखभालीची अजिबात गरज भासत नाही आणि ती दीड लाखहून अधिक किलोमीटरचे अंतर अतिशय सुकरतेने पार पडू शकते
उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी
- ८ केव्हीची सर्वोच्च शक्ती आणि ४२एनएमचा सर्वोच्च टॉर्क
- अत्यंत सुलभतेने चढण चढण्याची ट्रीओची क्षमता एकमेवाद्वितीय असून तिला १२.७ डिग्रीची ग्रेडेबिलीटी बहाल करण्यात आलेली आहे.
- एकदा चार्ज केल्यावर १३० किलोमीटर एवढी हिची वापरता येण्याजोगी ड्रायव्हिंग रेंज असून त्यामुळे एका दिवसात अधिकाधिक फेऱ्या आणि त्यायोगे अधिक उत्पन्न मिळविणे शक्य
अत्याधुनिक तंत्रज्ञान
- लिथियम आयन तंत्रज्ञान: महिंद्रा ट्रीओला आयपी६५ गुणवत्ताप्राप्त आधुनिक लिथियम आयन बॅटरीची शक्ती बहाल करण्यात आली असून त्यायोगे धुळीपासून आणि पाण्यापासून सर्वोच्च सुरक्षिततेची हमी मिळते.
- डायरेक्ट ड्राईव्ह ट्रान्समिशन: डायरेक्ट ड्राईव्ह ट्रान्समिशनसह हे येत असून ते गिअर विरहीत, क्लच विरहीत आणि व्हायब्रेशन विरहीत असल्यामुळे आरामशीर आणि तणावरहित अनुभूती देणारे आहे.
- सुलभ चार्जिंगची सुविधा: १६ए सॉकेटच्या सहाय्याने ऑनबोर्ड पोर्टेबल चार्जर वापरून महिंद्रा ट्रीओचे चार्जिंग कधीही कुठेही अगदी सुलभतेने करता येणार आहे.
- विश्वसनीय आयपी६७ प्रमाणित मोटर: धूळीपासून आणि पाणी आत शिरण्यापासून अधिक चांगले संरक्षण पुरविते
- गंजमुक्त बॉडी पॅनेल्स: मॉड्युलर प्रकारातील गंजमुक्त शीट मोल्डिंग कंपाऊंड (एसएमसी) पॅनेल्स स्वच्छ करण्यासाठी अतिशय सुलभ ठरतात
उत्कृष्ट जागा आणि आरामदायीपणा
- श्रेणीतील सर्वोत्तम व्हीलबेस: सर्वाधिक मोठा २०७३ एमएम आकाराचा व्हील बेस असलेली महिंद्रा ट्रीओ अधिक लेग रूम, सर्व वयोगटांना अत्यंत सुलभपणे आत बसणे व उतरणे यासह श्रेणीतील सर्वोत्तम आरामदायीपणा देणारी आहे
- विस्तारित सुरक्षितता: महिंद्रा ट्रीओला बाजूला दरवाजे असल्याने यातून प्रवास करणे अधिक सुरक्षित बनले आहे.
सर्वोत्कृष्ट वॉरंटी आणि विक्रीपश्चात सेवा
- स्टँडर्ड वॉरंटी: महिंद्रा ट्रीओ ३ वर्षे / ८००० किमी एवढ्या स्टँडर्ड वॉरंटीसह मिळणार असून त्याजोडीला ५ वर्षे/१००००० किमी एवढ्या विस्तारित वॉरंटीचा पर्याय देखील मिळणार आहे.
- सुलभ देखभाल: इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे सुमारे ३०० दालनांचे भारतातील सर्वात विशाल नेटवर्क
पाहा व्हिडीओ: