मुक्तपीठ टीम
कोरोनाचे सावट संपूर्ण जगभरात पसरलेले असताना अशा परिस्थितीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडण्यास समस्या येत आहेत. त्यांना सहाय्य करण्यासाठी महिंद्रा समुहाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली आपत्कालीन कॅब सेवा सुरू केली आहे.
महिंद्रा लॉजिस्टिकने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आपत्कालीन कॅब सेवा सुरू केली आहे. त्यांना लसीकरणासाठी आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन सेवांसाठी कॅब सेवेचा वापर करता येईल. ही सेवा सध्या मुंबई आणि पुण्याच्या काही भागात उपलब्ध आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व टॅक्सी निर्जंतूकीकरण केलेल्या असतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सुरू करण्यात आलेली ही आपत्कालीन कॅब सेवा मुंबईमध्ये वांद्रे, घाटकोपर, बोरीवली, ठाणे, अंधेरी या ठिकाणी असणार आहे. तर पुण्यामध्ये कात्रज, कोथरूड, भोसरी, पिंपळे सौदागर, खरडी या ठिकाणी असेल. या आपत्कालीन कॅब मधून प्रवास करत असताना मास्क घालणे आणि सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. तसेच आधार कार्ड असणेही आवश्यक आहे.
ही कॅब लसीकरण किंवा रूग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी आहे. तसेच यामध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत संपूर्ण काळजी घेतली जाईल.
पाहा व्हिडीओ: