मुक्तपीठ टीम
एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत पेट्रोल- डिझेलवरील एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून केंद्रसरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे मोदी सरकारचे हेच अच्छे दिन आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
ऑगस्ट महिन्यात साडे पंधरा लाख लोकांचे रोजगार गेले. बेरोजगारीने साडे आठ टक्क्याच्यावर उच्चांक गाठला आहे. लोकांचा खिसा खाली करण्याचे काम मोदीसरकार करत आहे.
पेट्रोल- डिझेल – गॅसमध्ये सवलत देण्याऐवजी केंद्रसरकार कोटीत कमाई करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदीसरकारने गेल्या दीड वर्षात आर्थिक चक्र बिघडवले आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
दरम्यान सर्वसामान्यांना सवलत देण्याचे धोरण मोदीसरकारकडे नाही हे आता स्पष्ट झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.








Subscribe