उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर म्हटलं की कला, क्रीडा आणि संस्कृतीची नगरी. लोकराजा शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वात कलाही आहेच. एका खास ‘महाताल उत्सव लोक वाद्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या निमित्त १२५ पेक्षा जास्त दुर्मिळ वाद्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. उस्ताद तौफिक कुरेशी, शिवमणी यासारख्या जागतिक ख्यातीच्या कलाकारांनी शाहू महाराजांना कलांजली वाहिली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा एक भाग म्हणून खासबाग मैदानात एक भन्नाट वेगळा कार्यक्रम पार पडला. सतत चार दिवस ‘महाताल उत्सव लोक वाद्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १२५ पेक्षा जास्त दुर्मिळ वाद्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. उस्ताद तौफिक कुरेशी, शिवमणी यासारख्या जागतिक किर्तीच्या वाद्य कलाकारांचे लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच प्रख्यात बासरीवादक हरीप्रसाद चौरासिया यांचे पुतणे पंडीत राकेश चौरासिया व त्यांच्या राकेश अॅण्ड फ्रेण्ड ग्रुपने सुरेल बासरीवादन केले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता, हे विशेष!
कोल्हापूर नगरीत गुंजला ‘महा-ताल वाद्यमहोत्सव’
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीप्रित्यर्थ सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यात निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे “महा-ताल: वाद्य महोत्सव” आयोजित करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दुर्मिळ लोकवाद्ये व त्याबाबतची माहिती आणि सादरीकरण प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना देण्यात आली.
महाराष्ट्राची वाद्यांची मोठी परंपरा…
- महाराष्ट्रात पारंपरिक वाद्यांची मोठी परंपरा आहे.
- महाराष्ट्रातील लोकवाद्यांच्या नामशेष होणाऱ्या / लोप पावत असलेल्या व लुप्त झालेल्या वाद्यांचे जतन व संवर्धन व्हावे, हा हेतू होता.
- तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वाद्ये कशी वाजतात याचा अनुभव प्रेक्षकांना देण्याचाही प्रयत्न झाला.
- वाद्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके देण्यात आले.
- या वाद्यांचे महत्व सर्वाना समजावे, त्याची माहिती व्हावी यासाठी राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्ताने हे प्रदर्शन होते.अशावाद्यांच्या जतन व संवर्धनासाठी महावाद्य मेळावा आणि पारंपरिक वाद्यांचा महोत्सव व प्रदर्शन आयोजित करण्यात आले,
कोल्हापुरातील खासबाग मैदानातील या महोत्सवास रसिकांनीही दाद दिली. - लोकवाद्यांमध्ये सुशिर वाद्ये, तंतू वाद्ये, नाद वाद्ये, घोष वाद्ये, रणवाद्ये असे विविध प्रकार पहावयास मिळतात.
कोणती लोकवाद्य?
तारपा, मोहरीपावा, घांगळी, घुमळ, कासाळे, संबळ, ढोलकी, मृदंग, पुंगी, सनई, तुणतुणे, पावा, घुंगरु, जोगिया सारंगी, खुळखुळा, चिमटा, मसक, सातारा, एकतारी, पिपाणी, नगारा, चिपळया, मटके, मुरसिंग, उमरु, दुदुंभी, खंजिर, शहनाई, सुंदरी, शिंग, तुतारी, कर्णा, सारिंदा, पेना, नंदुणी, मुरसिंगार, विचिमविणा, गोपीचंद, संबाला, सुरसोटा, घंटा, उहाळा, दिमडी, मादळ, डेरा, थाळी, तडफा, पेपुडी अशा कितीतरी वाद्यांचा या मेळाव्यामध्ये समावेश होता.