Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव

March 29, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Sulochana

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी  डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

           

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील  मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध पार्श्व गायक सोनू निगम आणि आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी  उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

              

पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात २ पद्मविभूषण, ५ पद्मभूषण आणि ५३ पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

                

कला क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी  किराणा  घराण्याच्या  ज्येष्ठ  गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून डॉ अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबतच ठुमरी, दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत,नाटय संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखनही त्यांनी केले आहे. कलाश्रेत्रातील योगदानासाठी त्यांना यापूर्वी  पद्मभूषण (२००२) आणि पद्मश्री (१९९०)  या नागरी सन्मानानेही  गौरविण्यात आले आहे. 

Dr Prabha Atre            

लावणी सम्राज्ञी  ज्येष्ठ लोकगीत गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या ७५ वर्षांपासून त्या  गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती चव्हाण  या, १९४६  पासूनच  हिंदी चित्रपटांमध्ये गायन करू लागल्या. ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये गायनास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी भाषांमध्येही भजन, गझल असे विविध प्रकारचे गायन केले आहे.  

Sulochana Chavan          

प्रसिध्द पार्श्वगीत गायक सोनू निगम  यांनाही  कला  क्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानासाठी  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉर्ड ऑफ कॉर्ड्स नावाने प्रसिध्द असलेल्या सोनू निगम यांनी हिंदी, मराठीसह एकूण १० भाषांमध्ये ४ हजार गीत  गायिली आहेत.                  

Sonu Nigam                  

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आयुर्वेदाचार्य  डॉ. बालाजी  तांबे  यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला  होता आज या कार्यक्रमात  त्यांच्या पत्नी  वीणा तांबे  यांनी  राष्ट्रपतींच्या हस्ते  हा  पुरस्कार स्वीकारला . डॉ. तांबे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ कार्य  केले. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवरही संशोधन केले आहे. त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले. दूरचित्रवाणीहून त्यांनी हजारो कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार- प्रसार केला. त्यांनी आयुर्वेदावर ५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.  

Veena Tambe


Tags: MaharashtraPadma Awards 2022गायक सोनू निगमगायिका सुलोचना चव्हाणडॉ. प्रभा अत्रेडॉ. बालाजी  तांबेपद्मपुरस्कारमहाराष्ट्र
Previous Post

टाकाऊतून टिकाऊ, चिमण्यांचं घरटं!

Next Post

“सायबर प्रलोभनाला बळी न पडता नेटवर्किंग साईटचा विचारपूर्वक वापर करा!”

Next Post
General Police madhukar Pandey

"सायबर प्रलोभनाला बळी न पडता नेटवर्किंग साईटचा विचारपूर्वक वापर करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!