Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन

January 27, 2022
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra's Biodiversity Standards painting

मुक्तपीठ टीम

‘अथांग सागर, रम्य किनारे। सह्याद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥…’ या वर्णनासह राज्याच्या जैवविविधतेचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’  चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांनी विविध मार्चींग कन्टीजंटचे नेतृत्व करून राजपथावर राज्याचा गौरव वाढवला.

Maharashtra's Biodiversity Standards painting Attracted peoples attention at rajpath

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेट शेजारील राष्ट्रीय युध्द स्मारक येथे देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच २१ तोफांची सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मिर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू राम यांना अभूतपूर्व शौर्य व बलीदानासाठी सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’ (मरणोत्तर) जाहीर झाले, आज या समारंभात बाबू राम यांच्या पत्नी रिना राणी आणि पूत्र माणिक शर्मा  यांनी हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

Maharashtra's Biodiversity Standards painting

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे प्रतिबिंब दर्शविणारा विविध फॉर्मेशनमधील ७५ विमानांचा फ्लाईंग पास या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, सीमा सुरक्षा दलाचे उंटदल, रणगाडे, आकाश क्षेपणास्त्र, युध्द टँक, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथकांची आकर्षक पेशकश उपस्थितांचे आकर्षण ठरले. राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथांसह १२ राज्यांचे चित्ररथ तसेच ७ केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांचे दमदार नेतृत्व

आजच्या पथ संचलनात मुळच्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांनी विविध युध्द टँकचे नेतृत्व केले. ७५ आर्मर्ड रेजिमेंटचे लेफ्टनंट स्वप्निल गुलाले यांनी भारतीय लष्कराच्या ‘अर्जुन’ या मुख्य युध्द टँकचे नेतृत्व केले. लेफ्टनंट ऋषिकेश सारडा यांनी आयसीव्हीबीएमपी २ टँकचे नेतृत्व केले. भारतीय लष्कराच्या व्हिंटेज सिग्नल यंत्रणेचा महत्वाचा भाग असलेल्या ‘एचटी १६’ या १४ इलेक्ट्रीकल वारफेयर बटालीयन कोर ऑफ सिग्नल यंत्रणेच्या विशेष मॉडेलचे नेतृत्व केले.

यावेळी नाशिक येथील आर्टीलरी सेंटरमधील ७५/२४ पॅक होमटर्ज मार्क १ या विशेष गनचेही पथसंचलन झाले.

महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाने जिंकली मने      

‘अथांग सागर, रम्य किनारे। सह्याद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥ जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा॥’ या शब्दांचा प्रसिध्द पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या आवाजातील अर्थपूर्ण रचनेसह राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल झाला. महाराष्ट्राचा हा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी  राज्याचा समृध्द जैवविविधता वारसाच  अनुभवला.

Maharashtra's Biodiversity Standards painting Attracted peoples attention at rajpath

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोट्या आकर्षंक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारे विविध जीवजंतू दर्शविण्यात आले. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती ,चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती  आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली  झरा, फ्लेमिंगो,  गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकले.

देशव्यापी ‘वंदे भारतम्’ नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या ४८० नर्तकांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम  सादर केला. महाराष्ट्रातील कलाकारांचाही यात समावेश होता. दृश्य कला पद्धतीचा वापर करून ‘कला कुंभ’ हा स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी  ७५ मीटर लांबीच्या  दहा लेखपटांचे  प्रदर्शनही यावेळी करण्यात आले.


Tags: Biodiversity StandardsMaharashtraNewdelhiRajpathइंडिया गेटजैवविविधता मानकेमहाराष्ट्र
Previous Post

मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!

Next Post

अनिल अवचट: जाणं एका अवलियाचं…कला, साहित्य, समाजकार्य सर्वत्र संवेदनशील सहभाग!

Next Post
Dr. Anil Awchat

अनिल अवचट: जाणं एका अवलियाचं...कला, साहित्य, समाजकार्य सर्वत्र संवेदनशील सहभाग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!